विक्रम वेधाच्या दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा, 'त्यापेक्षा हृतिक-सैफचा चित्रपट...'

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा विक्रम वेधा हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
Vikram Veda
Vikram Veda Saam Tv
Published On

मुंबई : विक्रम वेधा या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. तामिळ आणि हिंदी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांच्या कथानकावर अनेक प्रश्न, शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. रिमेक आणि ओरिजिनल चित्रपटात किती समानता किंवा किती वैविध्य आहे, अशा अनेक विचारल्या गेलेल्या अनेक प्रश्नांवर दिग्दर्शक पुष्कर यांनी मोठा खुलासा केला आहे.

Vikram Veda
ऐश्वर्या-सलमान खान यांच्यात अजूनही 'दुरावा'; 'द कपिल शर्मा शो'मध्ये आलीच नाही

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. स्टार कलाकार आणि जबरदस्त अॅक्शन असलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट २०१७ मध्ये आलेल्या विक्रम वेधा या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनीच या हिंदी रिमेकचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. अशातच दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनी सांगितले की, हृतिक आणि सैफला घेऊन तयार केलेला हा चित्रपट ओरिजिनल चित्रपटापेक्षा बराच वेगळा आहे.

Vikram Veda
VIDEO : पाय फॅक्चर तरीही शिल्पा शेट्टीचा फाल्गुनीच्या 'वासलडी' गाण्यावर गरबा, पाहा

तामिळ चित्रपटातील विक्रम वेधामध्ये विजय सेतुपती आणि आर माधवन यांनी काम केले आहे. चित्रपटाची कथा म्हणजे पोलीस आणि गँगस्टर यांच्यातील थरार आहे. विक्रम आणि वेताळ या पौराणिक कथेवर थोड्या फार प्रमाणात हा चित्रपट आधारित आहे. बरेच दिवस या दोन्ही चित्रपटाच्या कथानकावर चर्चा सुरू आहे. रिमेक आणि ओरिजिनल चित्रपट यात किती समानता किंवा किती वैविध्य आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं दिग्दर्शक पुष्कर यांनी दिली आहेत.

पुष्कर यांनी सांगितले की, 'स्ट्रीटकार नेम्ड डेथ किंवा डेथ ऑफ अ सेल्समन यासारख्या नाटकांकडे बघा. जगभरात या नाटकांना १०० वेळा बनविण्यात आले असेल. परंतु जेव्हा प्रॉडक्शन बदलते तेव्हा प्रॉडक्शन नवीन कलाकार घेऊन येतात. आम्ही विक्रम वेधा चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा असेच काही केले आहे. कथा तीच आहे, जी आम्ही काही वर्षांपूर्वी लिहिली होती. हृतिक आणि सैफ हे अभिनेते लिहिलेल्या शब्दांना एक पात्र म्हणून प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

Vikram Veda
Lata Mangeshkar Documentry : दिदींचे जीवन डॉक्युमेंटरीतून उलगडणार, संगीतप्रेमींची उत्सुकता शिगेला !

गायत्रीने सांगितले की, त्यांचा प्लान तामिळ फिल्म रिक्रिएट करणे कधीच नव्हता. चित्रपटाचे चित्रीकरण चेन्नईऐवजी लखनऊमध्ये झाल्याने तिथल्या संस्कृतीला जवळून बघण्याची संधी मिळाली. आम्हाला सुद्धा जाणवलं नाही की आम्ही सीन रिक्रिएट करत आहोत. आम्ही खूप वेळ चर्चा करायचो की हा सीन कसा करायचा किंवा तो सीन कसा करायचा. पण एकदाही असं वाटलं नाही की आपण हा सीन जसा आधी बनवला आहे तसा बनवूया. त्याचा आत्मा तोच आहे; परंतु चित्रपट वेगळा आहे.'

अभिनेता हृतिक रोशनने सुद्धा सांगितले की, त्यांच्याकडे अनेक सीन्स रिक्रिएट करण्याच्या पर्याय होता; परंतु त्यांनी तसं केलं नाही. विक्रम वेधा आणि मणिरत्नम यांचा 'पोन्नियिन सेल्वन' एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. ५०० कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटांसमोर कोणताही चित्रपट टिकणे कठीण आहे. यावर पुष्कर आणि गायत्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पुष्करने सांगितले की, 'पोन्नियिन सेल्वन ही एक क्लासिक कहाणी आहे. तुम्ही त्या कथेचा पराभव करू शकत नाही. या कादंबरीचे सहा भाग आहेत, जे आम्ही खूप आधीच वाचले आहेत. चेन्नईतून येणाऱ्या अनेक कलाकारांसाठी ही कथा एक प्रेरणा आहे. प्रेक्षक दोन्ही चित्रपट बघतील अशी अपेक्षा करतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com