मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडेच आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्राजक्ता लंडनला पोहोचली आहे. याबाबतची माहिती प्राजक्ताने स्वत: दिली. आता पुन्हा प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. जी साऱ्याचं लक्ष वेधते आहे.
चंदेरी दुनियात अनेकदा सेलिब्रिटी विविध ठिकाणी भेट देतात, फिरतात. तर तेथील आनंदाचे क्षण सोशल मीडियावर (Social Media)शेअर करतात. मात्र यावेळी प्राजक्तानं काहीशी वेगळी पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. तिने थेट थेम्स नदीच्या किनाऱ्यावरून भारताशी संवाद साधला आहे. "ने मजसी ने परत मातृभीला... सागरा प्राण तळमळला....." प्राजक्ता म्हणते की, भारताची आठवण येते असं म्हणणं चुकीच ठरेल. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो. एक क्षण देखील हिंदुस्थान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मुळीच रमलं नाही. प्राजक्तानं लंडनमधील तिचा अनुभव शेअर केला आहे. खास पोस्ट शेअर करत "तिनं इथे मन रमत नसल्याचं सागितलं आहे. असं का होतयं यामागची कारणे देखील तिनं सांगितली आहेत.
प्राजक्ता म्हणते, याच ब्रिटिशांनी आपल्याला फसवून १५० वर्षे राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळेल? कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग आहेच. राणी गेल्यानं देश दुखवट्यात,ती मरगळ वेगळीच जाणवतेय. तर थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं आहे.
कितीही सुंदर, स्वच्छ असलं तरी मात्र चैतन्य वाटत नाही. संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञानात येथील लोक माठ आहेत. हे त्यांना पाहून नक्कीच जाणवलं आणि या माठांनी १५० वर्षे भारतात राहून भारतातील संस्कृती, शिक्षण पद्धती, पेहराव यावरती माठगिरी केली आणि आपणही ती मोठ्या अभिमानाने स्वीकारली असल्याचं म्हटलं आहे.
स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी बऱ्याच अनुभवल्या मात्र लोकसंख्या कमी असल्याने ते शक्य आहे, यामध्ये विशेष कोणता रॉकेट सायन्स नसल्याचं म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे, परदेशात फिरल्यावर अनेकदा जाणवतं की सर्व अंगांनी माझा प्रिय 'भारत' किती महान देश आहे. कामासाठी आले आहे, नाहीतर चार दिवसांत धूम ठोकली असती, असं म्हणतं प्राजक्ताने देवाचे किती आभार मानू भारतात जन्मले.. फक्त २ दिवस बाकी... मायभूमीत परतत आहेच, असं म्हणत देशप्रेम व्यक्त केलं आहे.
प्राजक्ता माळी "महाराष्ट्राची हास्यजत्रा" या कार्यक्रमातून विश्रांती घेत आगामी चित्रपटासाठी लंडनला गेली आहे. लंडन चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलेल्या प्राजक्ताने चित्रपटाचे नाव व त्यातील कलाकार याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आगामी कोणत्या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी झळकणार आहे. हे देखील पाहणे औत्सुक्याचे असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.