बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर वासु भगनानी आणि ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्समध्ये वाद सुरू आहे. नेटफ्लिक्सने माझी फसवणूक केली असून ४७ कोटी रुपये लंपास केल्याचा गंभीर आरोप वासु भगनानी यांनी केला आहे. भगनानी यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. त्यांच्या या आरोपावर कंपनीने पलटवार करत भगनानी यांनी कंपनीचे कोट्यावधी रुपये थकवलेत उसा उलट वार केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंट कंपनीने आपल्या तक्रारीत नेटफ्लिक्ससह लॉस गॅटोस प्रोडक्शन सर्व्हिस इंडिया आणि झू डिजिटलच्या १० अधिकाऱ्यांवर हे गंभाीर आरोप केले आहेत.
वासु भगनानी यांच्याकडून करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की, हिरो नंबर वन, मिशन रानीगंज, बडे मिया छोटे मिया या प्रसिद्धा चित्रपटांना नेटफ्लिक्सवर स्ट्रिमींग मिळालं होतं. मात्र नेटफ्लिक्सने आमच्या कंपनीला अद्यापही स्ट्रीमिंग राइट्सचे ४७,३७ ,रुपये दिलेले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.
फिल्ममेकर्सकडून हे आरोप करण्यात आल्यानंतर नेटफ्लिक्सने देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये आमच्यावर लावलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलंय. उलट यावर पूजा इंटरटेनमेंट कंपनीने आमची बिले पूर्ण केलेली नाहीत असं म्हटलं आहे. तसेच आमच्या दोन्ही कंपनीचे टायअप फार वर्षांपासून आहे. त्यामुळे सध्या असलेल्या समस्या सुद्धा लवकर दूर होतील.
हिरो नंबर वन, मिशन रानीगंज, बडे मिया छोटे मिया या तिन्ही चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर हिरो नंबर वनमध्ये सारा अली खान आणि वरून धवन यांनी काम केल. २०१२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मिशन रानीगंज आणि बडे मिया छोटे मिया हे अक्षय कुमारचे उत्तम चित्रपट आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.