Netflix Recharge Offer
Netflix Recharge Offer Saam Tv

Netflix चा युजर्सना झटका! लवकरच बंद होणार स्वस्तातला सबस्क्रिप्शन प्लान, ग्राहकांच्या आनंदाला लागणार ब्रेक?

Netflix Budget Plan : Netflix हा ओटीटी प्लॅर्टफॉर्म सर्वाधिक पाहिला जाणारा अॅप आहे. यावर पाहाता येणाऱ्या सिरीज प्रत्येकजण वेगवेगळ्या पैशांमध्ये पाहातात. अशातच लवकरच Netflix चा सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लान बंद होणार आहे. त्यामुळे युजर्सच्या मनोरंजनाला ब्रेक लागेल.
Published on

Netflix Remove Basic Plan :

चित्रपट किंवा आपल्या आवडणारी वेबसिरीज प्रत्येकालाच निवांतपणे बसून पाहण्याची आवडत असते. हल्ली व्यस्त जीवनशैलीतुन प्रत्येकाला ते पाहता येत नाही. म्हणून त्यांना मिळेल त्या ठिकाणी ते पाहण्याचा अट्टहास प्रत्येक जण करत असतो.

Netflix हा ओटीटी प्लॅर्टफॉर्म सर्वाधिक पाहिला जाणारा अॅप आहे. यावर पाहाता येणाऱ्या सिरीज प्रत्येकजण वेगवेगळ्या पैशांमध्ये (Money) पाहातात. अशातच लवकरच Netflix चा सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लान बंद होणार आहे. त्यामुळे युजर्सच्या मनोरंजनाला ब्रेक लागेल.

कंपनीने असे म्हटले आहे की, गेल्या २ ते ३ वर्षांपासून महसूलाबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कॅनडा आणि ब्रिटनमधून Netflix ला काढून टाकण्यात आले आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने नवीन कमाई अहवाल सदर केला. या अहवालाच्या आधारे कंपनी (Company) मोठा निर्णय घेणार आहे.

Netflix Recharge Offer
VI चा जबरदस्त प्लान! अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह ६ महिने Swiggy-OTT चे Subscription मिळणार फ्री

२०२३ मध्ये चौथ्या तिमाहित अहवालात असे म्हटले आहे की, नेटफ्लिक्सच्या एकूण साइनअप खात्यांपैकी ४० टक्के बेसिक अकाउंट ज्यामध्ये अॅड सपोर्ट आहेत. त्यासाठी कंपनीने सगळ्यात स्वस्त प्लान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेटफ्लिक्सने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काही देशांमध्ये अनेक प्लानची किंमत वाढवली. याआधी प्लानची किंमत १० यूएस डॉलर आणि ७ युरो होती. यानंतर ऑक्टोबरमध्ये या प्लानची किंमत १२ यूएस डॉलर आणि ८ युरो करण्यात आली. गेल्यावर्षी जुलैमध्ये अनेक नवीन ग्राहकांसाठी मूलभूत योजना काढून टाकण्यात आल्या.

Netflix Recharge Offer
नवीन Smartphone ची Battery सतत ड्रेन होते? या टीप्स लक्षात ठेवा, चार्ज करायची गरज पडणार नाही

1. Netflixचा सगळ्यात स्वस्त प्लान भारतात बंद होईल?

भारतात Netflix चा सगळ्यात स्वस्त प्लान बंद होईल का याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या प्लानची किंमत १९९ रुपये आहे. या प्लानमध्ये एचडी व्हिडिओ क्वालिटी पाहायला मिळते. अनेक मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार कॅनडा आणि ब्रिटनमधून या मूलभूत योजना काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com