Jio Broadband Plans: एका रिचार्जमध्ये Netflix, Prime आणि Disney सह 15 OTT फ्री, सोबत मिळणार 300Mbps स्पीड

Free OTT Subscription Plan: रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लान आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ब्रॉडबँड प्लानबद्दल सांगणार आहोत, जो मनोरंजनप्रेमींना नक्कीच आवडेल.
Reliance Jio Free OTT Subscription Plan
Reliance Jio Free OTT Subscription PlanSaam Tv
Published On

Reliance Jio Free OTT Subscription Plan:

रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लान आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ब्रॉडबँड प्लानबद्दल सांगणार आहोत, जो मनोरंजनप्रेमींना नक्कीच आवडेल. या सिंगल प्लॅनमध्ये, ग्राहकांना Netflix (बेसिक), Amazon Prime आणि Disney + Hotstar यासह एकूण 15 मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळतात.

या व्यतिरिक्त हा प्लान फास्ट इंटरनेट स्पीडसह अनलिमिटेड कॉलिंग आणि 550+ टीव्ही चॅनेल देखील ऑफर करतो. चला तर या प्लानबद्दल सविस्तर माहिती जाणूनन घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Reliance Jio Free OTT Subscription Plan
Flex Fuel Bike: दिसायला कडक अन् चालवायला भारी; Bajaj ने आणली इथेनॉलवर धावणार नवीन Pulsar बाईक

आम्ही 1499 रुपयांच्या JioFibre पोस्टपेड प्लानबद्दल बोलत आहोत. या प्लॅनमध्ये 300 Mbps चा इंटरनेट स्पीड अपलोड/डाउनलोड उपलब्ध आहे. प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल देखील मिळतात. कॉलिंगसाठी कंपनी लँडलाइन कनेक्शन देते. ज्यामध्ये ग्राहकाला स्वतः लँडलाइन इन्स्ट्रुमेंट खरेदी करावे लागते. प्लानमध्ये 550+ टीव्ही चॅनेलचा अ‍ॅक्सेस देखील उपलब्ध आहे. (Latest Marathi News)

या प्लानमध्ये तुम्हाला 15 OTT सबस्क्रिप्शन मोफत मिनार आहेत. प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत OTT सबस्क्रिप्शनमध्ये Netflix (बेसिक), Amazon Prime, Disney+ Hotstar, Sony Liv, ZEE5, JioCinema, Sun NXT, Hoichoi, Discovery+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay आणि EPICON यांचा समावेश आहे.

Reliance Jio Free OTT Subscription Plan
Paytm च्या पेमेंट बँकेचा परवाना होणार रद्द? RBI ॲक्शन मोडमध्ये, ग्राहकांवरही होणार परिणाम

तुम्ही हा प्लान मासिक पर्यायासह, तसेच 3/6/12 महिन्यांसाठी घेऊ शकता. 3 महिन्यांच्या प्लानची ​​किंमत 4497 रुपये +GST, 6 महिन्यांच्या प्लानची ​​किंमत 8994 रुपये+GST आणि 12 महिन्यांच्या प्लानची ​​किंमत 17988 रुपये+GST आहे. 6 महिन्यांचा पर्याय निवडून तुम्हाला 15 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते तर 12 महिन्यांचा पर्याय निवडून ग्राहकांना 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. तुम्ही वेबसाइटला भेट देऊन याची अधिक माहिती घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com