harshad chopda Saam tv
मनोरंजन बातम्या

Harshad Chopda: 'गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मला चीट...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Harshad Chopda: 'लॉक अप २'मध्ये अभिनेता हर्षद चोप्राने प्रेयसी आणि जवळच्या मित्राकडून फसवणूक झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. २०१० मधील प्रसंग सांगताना तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Shruti Vilas Kadam

Harshad Chopda: 'लॉक अप'च्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्याच भागात अनेक स्पर्धकांनी त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक गुपितांचा खुलासा केला. आकांक्षा चमोलाने गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटाबाबत भाष्य केल्यानंतर आता 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता हर्षद चोप्रा यानेही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील वेदनादायक अनुभव शेअर केला आहे.

शोमध्ये फराह खान आणि रितेश देशमुख यांच्यासमोर बोलताना हर्षदने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी खूप मनमोकळ्या स्वभावाचा होता. प्रत्येकाशी सहज मिसळायचो आणि मित्रपरिवारही मोठा होता. मात्र एका घटनेने आयुष्यच बदलून गेले. माझ्या चाहत्यांना नेहमी वाटतं की मी फारसा कोणाशी मिसळत नाही. पण मी आधी असा नव्हतो. एक वेळ अशी आली की मी माझी गर्लफ्रेंड आणि माझा सर्वात जवळचा मित्र, दोघांनाही गमावलं."

यानंतर त्याने धक्कादायक खुलासा करत सांगितले की, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्याच जवळच्या मित्रासोबत त्याला चीट केलं. त्या घटनेनंतर मी लोकांपासून अंतर ठेवायला शिकलो. आजपर्यंत मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती," असे म्हणताना हर्षदच्या डोळ्यांत अश्रू आले.

त्याचे बोलणे ऐकून फराह खानने विचारले की, "हे गुपित तू इतकी वर्षे मनातच ठेवलेस?" त्यावर हर्षद म्हणाला, "हो... आजपर्यंत याबद्दल कुणालाच माहिती नव्हती." रितेश देशमुखने त्याला धीर देत म्हटले की, अशा वैयक्तिक गोष्टी संपूर्ण देशासमोर सांगण्यासाठी खूप धीर लागतो. त्यावर हर्षदने सांगितले की, ही घटना २०१० मध्ये घडली होती. "मी माझ्या जवळच्या माणसांवर खूप विश्वास ठेवतो. त्यामुळे एका दिवसात माझी प्रेयसी आणि माझा जिवलग मित्र दोघेही गमावणे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता.''

दरम्यान, अभिनेत्री शिवांगी जोशीने 'लॉक अप २'मध्ये हर्षदला आपला सेल-मेट म्हणून निवडले. 'बडे अच्छे लगते हैं ४'मधील त्यांच्या लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडीमुळे या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT