Nehal Vadoliya SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nehal Vadoliya : बॉयफ्रेंड बाथरूममध्ये गेल्यावर डायरेक्टरने किस केला, अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप

Subhash Ghai-Nehal Vadoliya : अभिनेत्री नेहल वडोलियाने प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री नेहल वडोलियाने प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेहल वडोलिया म्हणाली की, "सुभाष घई यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. "

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगले चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. सुभाष घई हे 80 आणि 90 च्या दशकातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहल वडोलियाने (Nehal Vadoliya) सुभाष घई यांनी तिला पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावून तिचा गैरफायदा घेण्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपाने मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. नेहल म्हणाली की, "मी सुभाष घईच्या मॅनेजरला डेट करत होती. आम्ही भेटत होतो. आमच्यात शारीरिक संबंध नव्हते.एकदा त्याने तुला सुभाष घईंच्या घरी पार्टीत बोलावले. मी गेले. मात्र तेथे सुभाष घई यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. "

पुढे नेहल म्हणाली, "आम्ही एका खोलीत बसून दारू ड्रिंक करत होतो. माझ्या हातून ग्लास पडला. त्यानंतर सुभाष घई मला बाहेर व्ह्यू दाखवण्यासाठी बाल्कनीत घेऊन गेले. तेथे ते माझ्याकडे एकटक पाहू लागेल. ते माझ्या जवळ आले. तेव्हा मला अस्वस्थ वाटले. सुभाष घई मला म्हणाले, तू खूप छान दिसते. तुझी स्माइल गोड आहे. तू इंडस्ट्रीत नाव कमावू शकते. तेव्हा मला विचित्र वाटले. मी थँक यू बोलून तिथून निघून गेले. "

शेवटी नेहल म्हणाली, "मी नंतर वॉशरुमला जाऊन आले. त्यानंतर माझा बॉयफ्रेंड वॉशरुमला गेला. तेव्हा सुभाष घई यांनी माझ्या जवळ येऊन मला किस करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे ओठ माझ्या गालावर लागले. मी खूप घाबरले. जसा माझा बॉयफ्रेंड बाहेर आला तसे ते घाईघाईत तेथून निघून गेले. मी त्यानंतर हे सर्व बॉयफ्रेंडला सांगितले. त्याच्यावर खूप चिडली. माझा त्याच्यावरून विश्वास उडाला आणि मी ब्रेकअप केले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघणार?

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार, विरोधक सरकारला घेरणार, कोणते मुद्दे गाजणार?

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT