Thalapathy Vijay : एका चित्रपटासाठी 200 कोटींपेक्षा जास्त मानधन, थलापति विजयची जपान-युरोपपर्यंत फॅन फॉलोइंग

Thalapathy Vijay Payment For Jana Nayagan : साउथ सुपरस्टार थलापति विजय सध्या त्याचा शेवटचा चित्रपट 'जना नायगन' मुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने चित्रपटासाठी किती मानधन घेतले जाणून घेऊयात.
Thalapathy Vijay Payment For Jana Nayagan
Thalapathy VijaySAAM TV
Published On
Summary

साउथ सुपरस्टार थलापति विजय यांचा लवकरच 'जना नायगन' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

थलापति विजय यांनी एका चित्रपटासाठी 200 कोटींपेक्षा जास्त मानधन घेतले आहे.

थलापति विजय यांचे जपान-युरोपपर्यंत फॅन फॉलोइंग आहे.

साउथ सुपरस्टार थलापति विजय (Thalapathy Vijay) यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2026मध्ये त्यांचा 'जना नायगन' (Jana Nayagan) हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,थलापति विजय यांनी सर्वाधिक मानधन घेण्याच्या बाबतीत शाहरुख खान, अल्लू अर्जुन आणि रजनीकांत यांना मागे टाकले आहे.

2024 मध्ये थलापति विजय यांचा 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (Goat) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात अंदाजे 464 कोटी रुपयांची कमाई केली. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपटासाठी थलापति विजय यांनी तब्बल 200 कोटी रुपये मानधन घेतले. अर्चना कल्पथी या 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह निर्मात्या आहेत.

'गलाटा 'ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट निर्मात्या अर्चना कल्पथी यांनी खुलासा केला की, "थलापती विजय यांना 'Goat' चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. यामुळे विजय भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला. त्याने शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, प्रभास, अल्लू अर्जुन आणि रजनीकांत यांसारख्या सुपरस्टार्सना मागे टाकले."

जास्त मानधनाचे स्पष्टीकरण देताना चित्रपट निर्मात्या अर्चना कल्पथी म्हणाल्या, "हे मानधन अभिनेत्याच्या मागील चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर आधारित होते. गेल्या काही वर्षांत अभिनेत्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून आपला दर्जा वाढवला आहे. शिवाय,'Goat'च्या आधी प्रदर्शित झालेल्या 'लिओ'ने देखील बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. चांगल्या कमाईचा थलापति विजय यांचा सलग सातवा चित्रपट होता."

'जना नायगन' मानधन किती?

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, थलापति विजय त्यांच्या शेवटच्या चित्रपट 'जना नायगन'साठी (Jana Nayagan) 275 कोटी रुपये घेत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हे सर्वाधिक मानधन असणार आहे. थलापति विजय यांचे खूप मोठे चाहते आहेत की , त्याचे चित्रपट केवळ तामिळनाडूमध्येच नव्हे तर जपान आणि युरोपसह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.'जना नायगन' हा चित्रपट 9 जानेवारी 2026 ला रिलीज होणार आहे. 'जना नायगन' चित्रपट 'थलापति 69' (Thalapathy 69) म्हणूनही देखील ओळखला जातो.

Thalapathy Vijay Payment For Jana Nayagan
'Bigg Boss 19'च्या घरात झाले शॉकिंग एलिमिनेशन, 'या' सदस्याचा प्रवास संपला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com