Nayanthara Saam Tv
मनोरंजन बातम्या

लग्नाच्या चार महिन्यांनंतर नयनतारा झाली आई; घरी जुळ्या मुलांचे आगमन

नयनतारा व विग्नेश गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

Shivani Tichkule

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनताराच्या (Nayanthara) घरी 2 नव्या पाहुणायचे आगमन झाले आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच नयनतारा आई झाली आहे. नयनताराच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन झालं आहे. पती विग्नेश शिवनने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. शिवनने स्वतःचे आणि पत्नी नयनताराचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो दोन्ही मुलांच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे. (Nayanthara And Vignesh Shivan blessed with twins baby boy)

विग्नेश शिवनचे ट्विट

विग्नेश शिवनने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने बाळांच्या पायांचे चार फोटो शेअर केले आहे. या फोटोत पत्नी नायनतारा आणि शिवन दोघेही मुलांच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे. तर एका फोटोत नयनतारा ही बाळाच्या पायाकडे बघत गोड हसताना दिसत आहे.

'नयन आणि मी आज आई आणि वडील झालो आहोत. आम्हाला जुळी मुलं झाली आहेत. आमच्या सर्व प्रार्थना आणि आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला दोन्ही मुलांच्या रुपात मिळाले आहेत. आम्हाला तुमच्या सर्व प्रार्थनांची गरज आहे. उईर आणि उलगम.' असे कॅप्शन फोटोज शेअर करताना विग्नेशने दिले आहे.

नयनताराचा जून महिन्यात विवाह झाला होता

नयनतारा व विग्नेश गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर यावर्षी 9 जून रोजी नयनतारा आणि विघ्नेश शिवनचे चेन्नईत लग्न झाले. चाहत्यांना ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी खूप आवडते. नयनतारा आणि विघ्नेशच्या लग्नाचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT