crime news
crime newsSaamTv

Latur Crime : धक्कादायक! मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
Published on

Latur Crime News : लातूर (Latur) शहरातील बाबानगर खाडगाव रोड येथे भावानेच आपल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात व खांद्यावर चाकूने सपासप वार करून खून केला आहे. ही खळबळजनक घटना 8 ऑक्टोम्बर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून (Police) देण्यात आली आहे. (Latur Crime News In Marathi)

crime news
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लक्झरी बसवर दगडफेक; प्रवासी जखमी

शहरातील बाबानगर येथे राहणारा नितीन उर्फ सुभाष आलकुंटे याचे पत्नीसोबत पटत नसल्याने त्याची पत्नी गेल्या तीन वर्षांपासून त्याला सोडून पिंपरी चिंचवड येथे राहते. त्यामुळे नितीन हा दारू पिऊन घरातील सर्वाना नेहमी भांडत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा मोठा राहुल याच्याशी भांडण झाले होते. तेव्हापासून दोघांचे पटत नव्हते.

काल रात्री या दोन भावात भांडण झाले. यात राहुल याने नितीनच्या पोटात आणि खांद्यावर चाकूचे सपासप वार केले आणि यातच त्याचा मृत्यू झाला. आई लक्ष्मीबाई आलकुंटे यांनी दिलेल्या जवबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात राहुल आलकुंटे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस एस कराड अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com