तालिबानचं कौतुक करणाऱ्या भारतीय मुसलमानांवर नसीरुद्दीन शाह यांची टीका
तालिबानचं कौतुक करणाऱ्या भारतीय मुसलमानांवर नसीरुद्दीन शाह यांची टीका Saam Tv News
मनोरंजन बातम्या

तालिबानचं कौतुक करणाऱ्या भारतीय मुसलमानांवर नसीरुद्दीन शाह यांची टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवु़मधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे आपल्या रोखठोक मतांसाठी चर्चेत असतात. तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afganistan) ताबा मिळवल्यानंतर काही भारतीय मुसलमानांनी (Indian Muslims) याचं समर्थन केलं होतं. तालिबानचं समर्थन करणाऱ्या या भारतीय मुसलमानांवर नसीरुद्दीन शाह यांनी निशाणा साधला आहे. अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानने ताबा मिळवल्याने काही भारतीय मुस्लीम आनंदी होत आहेत हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे,’ असे नसीरुद्दीन शाह म्हणाले. (Viral Video: Naseeruddin Shah criticizes Indian Muslims for praising Taliban)

हे देखील पहा -

समाज माध्यमांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होत असून ट्विटरवरदेखील ट्रेंड करत आहे. या व्हिडिओत नसीरुद्दीन यांनी भारतीय मुसलमानांना उद्देशून एक संदेश दिला आहे. या व्हिडिओत ते म्हणातात की, ''तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवणे ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानने ताबा मिळवल्याने काही भारतीय मुस्लीम आनंदी होत आहेत हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे.

भारतीय इस्लाम हा जगभरातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे आणि अल्लाहने ती वेळ आणायला नको पाहिजे जिथे तो खूप बदलेल आणि आपण त्याला ओळखूही शकणार नाही. आज भारतीय मुस्लिमांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की इस्लामला सुधारणा आणि आधुनिकतेची गरज आहे की जुन्या काळात सुरु असलेली क्रुरतेची? मी हिंदुस्तानी मुस्लीम आहे आणि मिर्झा गालिब यांनी खूप आधी म्हटल्याप्रमाणे, माझा अल्लाहशी संबंध हा अनौपचारिक आहे. मला राजकीय धर्माची गरज नाही.’ असंही ते म्हणाले असून त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

नसीरुद्दीन यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्या या मताचं समर्थन करत त्यांचं कौतुकही केलं आहे. तर काहींनी नसीरुद्दीन शाह यांच्यावरच टीका केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान लवकरच सरकार स्थापन करणार आहे त्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु आहेत. तालिबानने भारताशी मैत्रीपुर्ण संबंध हवे आहेत असं म्हटलं असलं तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणं धोकादायक आहे. त्यामुळे तालिबान सत्तेवर येणं ही भारताच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ पर्यंत ५३.४० टक्के मतदान

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

DC vs RR,IPL 2024: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT