12 आमदारांच्या 'त्या' यादीत तालिबानी नव्हते - संजय राऊत (पहा व्हिडिओ)

राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
12 आमदारांच्या 'त्या' यादीत तालिबानी नव्हते - संजय राऊत (पहा व्हिडिओ)
12 आमदारांच्या 'त्या' यादीत तालिबानी नव्हते - संजय राऊत (पहा व्हिडिओ)Saam Tv
Published On

मुंबई - विधान परिषदेवरील रखडलेल्या नियुक्त्या लवकर कराव्यात यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray , उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवर आता संजय राऊत Sanjay Raut यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीनंतर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

भेटीनंतर राज्यपालांनी त्यांचा निर्णय कृतीतून दाखवावे. तिथले हसरे फोटो प्रसिद्ध झाल्याने वातावरण प्रसन्न होते असे दिसून येत आहे त्यामुळे लवकरच राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील. राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर त्यांनी ते स्पष्ट केले पाहिजे.

महाराष्ट्रात सरकार विरुद्ध राजभवन हा संघर्ष कधी झाला नाही, तो यानिमित्ताने का होतोय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणे हे त्यांचे काम आहे. जी 12 नाव मंत्रिमंडळाने दिली होती ती काय तालिबान कडून प्रशिक्षण घेऊन आलेले नाही किंवा ते गुंड नाहीत. यात साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील नाव आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आता लवकर निर्णय घ्यावा. असे देखील यावेळी संजय राऊत म्हणाले.

12 आमदारांच्या 'त्या' यादीत तालिबानी नव्हते - संजय राऊत (पहा व्हिडिओ)
पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे प्राचीन मंदिरे नष्ट होण्याच्या मार्गावर

दरम्यान, यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्र पुढे खूप मोठी कामे आहेत. देशात पहिल्या पाच मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे. शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार आजपर्यंत कोणी केले नाहीत. बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले या चर्चेत आता आम्ही जात नाही. महाराष्ट्रातलं वातावरण आता वेगळे आहे आणि या जनतेला मदतीची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com