Nana Patekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nana Patekar : मुरूडच्या किनाऱ्यापासून अभिनयाच्या शिखरापर्यंत... असा राहिला भारतीय सिनेसृष्टीच्या 'नटसम्राट'चा जीवनप्रवास

Nana Patekar Life Journey : ज्येष्ठ मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नाना पाटेकरांचे हार्ट अटॅकने निधन

नाना पाटेकरांचा संघर्षमय जीवनप्रवास

मनोरंजनसृष्टी शोक सागरात

आज ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मनोरंजन विश्वातील तारा हरपला. ज्येष्ठ मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि रंगभूमीशी घट्ट नाते असलेले कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा खरा प्रवास केवळ लोकप्रियतेचा नाही, तर संघर्ष, मेहनत, रंगभूमीवरील अनुभव आणि स्वतःची स्वतंत्र अभिनयशैली निर्माण करण्याचा आहे.

नाना पाटेकरांचा जन्म, बालपण आणि शिक्षण

नाना पाटेकरांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजिरा महाराष्ट्र येथे झाला. त्याचे पूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. नाना पाटेकर यांचे बालपण सामान्य परिस्थितीत गेले. ते शिक्षणासाठी मुंबईत आले. सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांच्यामध्ये कला आणि चित्रकलेचीही आवड होती. त्यांना सुरुवातीच्या आयुष्यात आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. या संघर्षाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि पुढील अभिनयावर मोठा प्रभाव पडला.

रंगभूमीपासून अभिनयाची सुरुवात

नाना पाटेकर यांच्या अभिनयाची खरी जडणघडण मराठी रंगभूमीवर झाली. ते विजया मेहता यांच्याशी संबंधित प्रसिद्ध रंगायन नाट्यसंस्थेशी जोडले गेले आणि हमीदाबाईची कोठी यांसारख्या नाटकांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. रंगभूमीने त्यांना संवादफेक, देहबोली, आवाजातील चढ-उतार आणि व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास शिकवला.

चित्रपटात प्रवेश

नाना पाटेकर यांनी १९७०च्या दशकात चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात गमन(Gaman) या १९७८ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातून झाली.१९८९ मधील 'परिंदा' हा नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. जब्बार पटेल दिग्दर्शित 1979 मधील राजकीय नाटक 'सिंहासन' हा नाना पाटेकरांचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यानंतर त्यांचा मराठी चित्रपट 'नटसम्राट' खूप गाजला. १९९१ मध्ये नाना पाटेकर यांनी 'प्रहार: द फायनल अटॅक' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. नाना पाटेकर यांनी नायक, खलनायक, सहाय्यक भूमिका, गंभीर व्यक्तिरेखा आणि विनोदी पात्रे अशा विविध प्रकारच्या भूमिका केल्या.त्यांना विनोदी भूमिकांमधूनही प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'वेलकम' या चित्रपटातील उदय शेट्टी ही व्यक्तिरेखा सर्वाधिक लोकप्रिय ठरली. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले.

सामाजिक कार्य

नाना पाटेकर यांचा प्रवास केवळ अभिनयापुरता मर्यादित राहिला नाही. २०१५ मध्ये त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘नाम फाउंडेशन’ सुरू केले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि ग्रामीण समाजाला मदत करण्यासाठी संस्थेने विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : बीएमसीच्या जेन झी फेलोशिपमध्ये घोळ? 150 जणांची निवड, गुण मात्र गुलदस्त्यात

Maharashtra News Live Update : अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची लोणावळामध्ये कारवाई

EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता UPIद्वारे काढता येणार PFचे पैसे; जाणून घ्या नवी सुविधा

Navratri 2026: नवरात्रीत रोज दिसा हटके! नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी परफेक्ट लूक आयडिया

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दसऱ्याचं गिफ्ट मिळणार, या तारखेला खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT