नाना पाटेकर बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आहेत.
नाना पाटेकरांचा जिममधला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नाना पाटेकर गळ्यात गमछा गुंडाळून व्यायाम करताना दिसत आहेत.
आपल्या अनोख्या स्टाइलने नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी इंडस्ट्री गाजवली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाचे आणि मन मोकळ्या स्वभावाचे लाखो चाहते दिवाने आहेत. नाना पाटेकर वयाच्या ७६ वर्षीयही एकदम फिट अँड फाइन आहेत. त्यांच्या उत्साहाचे सर्वजण कौतुक करतात. अशात आता नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नाना पाटेकर वयाच्या ७६ वर्षीय जिममध्ये कठोर व्यायाम करताना दिसत आहेत. गळ्यात गमछा घालून ते ज्या प्रकारे व्यायाम करतात ते पाहून चाहते थक्क झाले आहेत. तरुणाईसाठी ते एक आदर्श उदाहरण आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. व्यायाम करताना नाना पाटेकरांचा उत्साह, आनंद आणि एनर्जी सर्वच कौतुकास्पद आहे.
नाना पाटेकर कायम आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतात. चित्रपट निर्माते आणि छायाचित्रकार अतुल कासवेकर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नाना पाटेकरांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेते जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. त्यांनी १५ बार डिप्स केल्या आहेत. नाना पाटेकरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अलिकडेच नाना पाटेकर शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' या चित्रपटात आणि 'संकल्प' या वेब सीरिजमध्ये दिसले. विशेष म्हणजे, हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी ठरले. त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ते 'संकल्प' या वेब सीरिजचा सीझन २ मध्येही झळकणार आहेत. ही सीरिज लवकरच ओटीटीवर येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.