Shreya Maskar
चालणे म्हणजे वेगाने चालणे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी यापेक्षा सोपा आणि अधिक फायदेशीर व्यायाम नाही. तुम्ही रोज १०-१५ मिनिटे तर बाहेर चालायला जा. किंवा घरात मोठी बाल्कनी असेल तर तेथे फिरा.
जलद चालण्यामुळे रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सरळ होतो. तसेच आयुष्यात चढउतार येतच राहतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे टेन्शन घेणे सोडा आणि आनंदाने जगा.
स्ट्रेचिंगमुळे शरीराची लवचिकता वाढते, जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामुळे तुमचे स्नायू मोकळे होतात, ज्यामुळे दुखापतीची शक्यता कमी होते.
स्ट्रेचिंग रक्ताभिसरण सुधारते. स्ट्रेचिंगमुळे शरीर आणि मन या दोन्हींमधील तणाव कमी होतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वजन कमी करणे महत्त्वाचे आहे. पोहणे हा देखील एक व्यायामाचा भाग आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीज बॅन होतात.
स्ट्रेंथ ट्रेनिंग हा देखील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी एक चांगला व्यायाम मानला जातो. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत होतात आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कॅलरीज बॅन होतात.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी योगा खूप उपयुक्त ठरतो. आसनांव्यतिरिक्त, प्राणायाम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो. यामुळे लवचिकता, संतुलन आणि सहनशक्ती देखील सुधारते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.