High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Shreya Maskar

बीटरूट ज्यूस

बीटमध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज एक ग्लास बीटरूटचा रस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Beetroot Juice | pinterest

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

pomegranate Juice | pinterest

गाजराचा ज्यूस

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन आणि पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हा रस हृदयाचे आरोग्य देखील सुधारतो. एक ग्लास दररोज प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या टळतात.

Carrot Juice | pinterest

पालकचा ज्यूस

पालकमध्ये मॅग्नेशियम आणि नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तवाहिन्या रुंद करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. पालकचा रस रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

Spinach Juice | pinterest

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Tomato Juice | pinterest

टरबूजचा रस

टरबूजमध्ये एल-सिट्रुलिन नावाचे एक संयुग असते, जे रक्तवाहिन्यांना शिथिल करते आणि रक्तदाब नियंत्रित करते. टरबूजचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) टाळण्यासही मदत होते.

Watermelon Juice | pinterest

संत्र्याचा रस

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्ताभिसरण सुधारतात. दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Orange Juice | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : काजू-बदाम नाही; हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ड्रायफ्रूट वरदान

High blood pressure | saam tv
येथे क्लिक करा...