High Blood Pressure : काजू-बदाम नाही; हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ड्रायफ्रूट वरदान

Shreya Maskar

ड्रायफ्रूट्स

BP कंट्रोल करण्यासाठी ‌ड्रायफ्रूट्स खूप महत्त्वाचे आहेत. मनुका ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी रामबाण उपाय आहे. मनुका या ड्रायफ्रूटचे फायदे आताच नोट करा.

Dry Fruits | pinterest

मनुका

मनुका या ड्रायफ्रूट्समध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणासाठी उत्तम पदार्थ आहे.

Raisins | pinterest

BP कंट्रोल करा

मनुका रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाचा सामना करण्यासाठी मनुका नैसर्गिक, कमी-सोडियमचा पर्याय म्हणून काम करते.

Control Your BP | pinterest

रक्तदाब कमी

दररोज नियमितपणे मनुका खाल्ल्याने सिस्टोलिक रक्तदाब कमी होण्यास मदत होते, विशेषतः प्री हायपरटेन्सिव्हअसलेल्या व्यक्तींमध्ये.

Lowering Blood Pressure | pinterest

कधी खावे?

रक्तदाब कमी करण्यासाठी मनुका खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी रिकाम्या पोटी आहे. रात्रभर पाण्यात भिजवलेले ५-६ काळे मनुके सकाळी खाल्ल्याने पोटॅशियमचे शोषण चांगले होते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Eat | pinterest

मनुक्याचा रंग

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी काळ्या मनुका सर्वात फायदेशीर मानल्या जातात. त्यामुळे त्यांचा डाएटमध्ये सहभाग करून ठेवा.

Color of Raisins | pinterest

इतर ड्रायफ्रूट्स

अक्रोड, पिस्ता देखील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पिस्तामध्ये कॅलरीज कमी असतात. तसेच अक्रोड, पिस्ता हे फायबरने समृद्ध आहेत. तसेच यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत.

Dry Fruits | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

High Blood Pressure | google

NEXT : BP कंट्रोल करण्यासाठी लाइफस्टाइमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, औषधांची गरजही भासणार नाही

High Blood Pressure | pinterest
येथे क्लिक करा...