High Blood Pressure : BP कंट्रोल करण्यासाठी लाइफस्टाइमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, औषधांची गरजही भासणार नाही

Shreya Maskar

आहार

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे, कडधान्यांचा समावेश करा. तसेच फळे खा आणि फळांचे ज्यूस प्या.

Diet | pinterest

जंक फूड

जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळणे आवश्यक आहे. कारण ते शरीरातील दाह वाढवतात आणि रक्तदाब आणखी बिघडवू शकतात. त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा.

Junk Food | pinterest

मीठ

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. दररोज मीठाचे सेवन मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जेवणात अतिरिक्त मीठ घालणे टाळा. तसेच साखरेचे सेवन कमी करा.

Salt | pinterest

पोषक घटक

शरीरात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक वाढवा. हे तिन्ही घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करतात. पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना आराम देतात.

Nutrients | pinterest

कोलेस्ट्रॉल टाळा

चरबी आणि कोलेस्ट्रॉल जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास वाढू शकतो. तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे कमी करा.

Cholesterol Foods | pinterest

वजन कमी

जास्त वजन किंवा लठ्ठपणा हे उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण आहे. वजन कमी केल्याने रक्तदाबावर थेट सकारात्मक परिणाम होतो.

Weight Loss | pinterest

टेन्शन सोडा

तणाव हे उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण आहे, त्यामुळे नियमित योगा , प्राणायाम आणि ध्यान केल्याने मन शांत होते. टेन्शन कमी होते. ज्यामुळे रक्तदाब हळूहळू सामान्य पातळीवर येतो.

Stress | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : उन्हाळ्यात हाय BP कसा कंट्रोल कराल? ‘या’ टिप्स ठरतील रामबाण उपाय

High Blood Pressure | saam tv
येथे क्लिक करा...