Shreya Maskar
उन्हाळ्याच्या उष्णतेत जास्त घाम आल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. त्यामुळे अस्वस्थ वाटते आणि चक्कर येते.
डिहायड्रेशनमुळे रक्तदाब अचानक कमी किंवा जास्त होऊ शकतो. म्हणून दिवसभर थोडे थोडे पाणी प्या. नारळाचे पाणी आणि लिंबाचे पाणी फायदेशीर ठरते.
BP चा त्रास असणाऱ्यांनी मीठ कमीच खावे. मिठातील सोडियममुळे रक्तदाब वाढतो. म्हणून, कोणत्याही समस्या टाळण्यासाठी शक्य तितके मीठ कमी खा.
जड, तळलेले आणि मसालेदार पदार्थ पचनक्रियेवर परिणाम करू शकतात आणि रक्तदाब वाढवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः हे पदार्थ खाणे टाळा.
फळे, हिरव्या भाज्या, सॅलड आणि फायबरयुक्त आहार घेणे उत्तम आहे, ज्यामुळे शरीर थंड राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
सूर्यप्रकाशाच्या अति संपर्कामुळे शरीराचे तापमान वाढते. ज्यामुळे चक्कर येते, अशक्तपणा आणि रक्तदाबाचे असंतुलन होऊ शकते. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळा.
अति प्रमाणात चहा, कॉफी आणि जंक फूडमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. परिमाणी रक्तदाब वाढतो. उन्हाळ्यात कॅफी, चहा ऐवजी ताजे फळांचे रस आणि ताक प्या.
मानसिक ताण हे देखील उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण आहे. उन्हाळ्यात चिडचिड आणि थकवा वाढू शकतो, त्यामुळे योग, ध्यान आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने केवळ मन शांत होत नाही, तर रक्तदाबही संतुलित राहतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.