High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'या' भाज्या, फळे वरदान

Shreya Maskar

BP का वाढतो?

अयोग्य जीवनशैली, अति मीठ सेवन, मानसिक ताण, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता यांमुळे ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवतो. नियमित आहारातून तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवू शकता.

Blood Pressure Rise | pinterest

आहार तज्ज्ञांचा सल्ला

आहार तज्ज्ञांचा सल्ल्यानुसार, हेल्दी फळे आणि भाज्या तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. 'सुपरफूड्स' कोणते, जाणून घेऊयात.

Expert Dietary Advice | pinterest

पौष्टिक भाजी

पौष्टिक भाजी उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे. कारल्यातील विशेष पोषक तत्वे केवळ रक्तदाब नियंत्रणात ठेवत नाहीत, तर रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासही मदत करतात.

Vegetables | pinterest

पौष्टिक फळ

उच्च रक्तदाबासाठी पेरू हा एक उत्तम फळांचा पर्याय आहे. पेरूमध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम आपल्या शरीरातील सोडियमचे दुष्परिणाम कमी करते, ज्यामुळे रक्तदाब सामान्य राहतो आणि हृदय निरोगी राहते.

Fruits | pinterest

जवस

जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. दररोज एक चमचा भाजलेले जवस खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Flaxseeds | pinterest

डायफ्रूट्स

बदाम केवळ बुद्धीच तल्लख करत नाहीत, तर तुमच्या हृदयाचीही काळजी घेतो. त्यामध्ये आरोग्यदायी फॅट्स आणि मॅग्नेशियम असतात, जे रक्तदाब कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.४-५ बदाम सोलून रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा आणि सकाळी खा.

Dry fruit | yandex

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांचे पाणी BP कंट्रोल करण्यास मदत करतात. अर्धा चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या. यामुळे तुमचा रक्तदाब आणि साखर नियंत्रित करण्यास मदत करेल.

Fenugreek Seeds | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : झटपट वजन कमी करायचंय? रोज सकाळी करा 'हा' हेल्दी नाश्ता, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा...