Shreya Maskar
तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर सकाळच्या नाश्त्याला मूग डाळ चिल्ला बनवा. हा पचायला हलका असल्याने चयापचय क्रिया वेगवान करून चरबी जाळण्यास मदत करतो.
मूग डाळ चिल्लामध्ये उच्च प्रथिने , भरपूर फायबर आणि कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
मूग डाळ चिल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुवून ६ ते ८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवावी. भिजवल्यामुळे डाळ मऊ होते आणि पचायला सोपी जाते.
त्यानंतर डाळीतले पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये आले, हिरव्या मिरच्या घालून चांगले वाटून घ्या. पेस्ट जास्त पातळ आणि जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
मिश्रण खूप पातळे किंवा खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. यात चवीनुसार मीठ, हळद आणि जिरे, हिंग घाला. मिश्रण झाकून १०-१५ मिनिटे चांगले मुरू द्या.
मूग डाळ चिल्ला बनवण्यासाठी पॅन गरम करून त्यात तेल टाका. त्यात तयार मिश्रण टाकून गोलसर पसरवा. दोन्ही बाजूंनी चिल्ला खरपूस भाजा.
मूग डाळ चिल्ला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, पालक किंवा मेथी घालून घालू शकता.
मूग डाळ चिल्ला प्रथिनांनी समृद्ध आणि ग्लूटेन-मुक्त असल्यामुळे, मधुमेह आणि पचनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.