Missi Roti Recipe : साध्या चपातीला द्या चटपटीत ट्विस्ट; झटपट बनवा मिस्सी रोटी, अगदी सोपी आहे रेसिपी

Shreya Maskar

पंजाबी डिश

मिस्सी रोटी प्रामुख्याने उत्तर भारतात, विशेषतः पंजाब आणि राजस्थानमध्ये बनवली जाणारी एक पारंपारिक आणि पौष्टिक चपाती आहे. ही अनेकदा तंदूर किंवा तव्यावर भाजली जाते.

Punjabi Delicacy | yandex

मिस्सी रोटी

मिस्सी रोटी बनवण्यासाठी लाल तिखट, हळद, धणे पूड, हिरवी मिरची, कांदा, कसुरी मेथी, तेल, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Missi Roti | yandex

बेसन

मिस्सी रोट बनवण्यासाठी एका भांड्यात दीड कप बेसन आणि एक कप गव्हाचे पीठ घ्या. दोन्ही पीठ एकत्र मिक्स करा.

Besan | yandex

कसुरी मेथी

पीठात लाल तिखट, हळद, धणे पूड, हिंग, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून चांगले मिक्स करा. लक्षात घ्या सर्व मसाले पिठाला लागले पाहिजेत.

Kasuri Methi | yandex

कोथिंबीर

त्यानंतर मिश्रणात हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी आणि तेल घालून एक कणीक मळून घ्या.

Coriander | yandex

पाणी

कणीक मळण्यासाठी यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळा. तयार पीठ चांगले मुरण्यासाठी ५ ते १० मिनिटे झाकून ठेवून द्या.

Water | yandex

रोटी भाजा

आता, पीठाचे छोटे गोळे बनवा आणि रोटीप्रमाणे लाटा. रोटीच्या एका बाजूला थोडे पाणी लावा आणि ती बाजू गरम तव्यावर ठेवा. जेव्हा रोटी थोडी फुगू लागेल, तेव्हा तवा धरून थेट गॅसवर चपाती भाजून घ्या. जेव्हा रोटी पूर्णपणे शिजेल तेव्हा काढा.

Roasting the Roti | yandex

डाळ -रोटी

शेवटी मिस्सी रोटीला बटर लावून तिचा आस्वाद घ्या. तुम्ही मिस्सी रोटी डाळ मखनी, मटार पनीर किंवा तुमच्या आवडीच्या रस्सा भाजीसोबत खा.

Dal-Roti | yandex

NEXT : ना परतायची गरज ना भाजायची, फक्त ५ मिनिटांत 'अशी' बनवा कांद्याची झणझणीत चटणी

Kandyachi Chutney Recipe | saam tv
येथे क्लिक करा...