Shreya Maskar
कांद्याची चटणी बनवण्यासाठी कच्चा कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, तेल इत्यादी साहित्य लागते.
कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा आणि लसूण सोलून बारीक चिरून घ्या. दोघांचे समान प्रमाण घ्या.
आता खलबत्यात चिरलेला कांदा, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक कुटून घ्या. कोवळ्या हिरव्या मिरच्यांचा वापर करा.
कांद्याची चटणीमध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, तेल घालून मिश्रण नीट कुटून घ्या. तेलामुळे चटणीला एक खास सुगंध येऊ लागले.
तुम्ही आवडीनुसार यात लिंबाचा रस घाला. चटणीची चव आणखी वाढेल. जेवताना तोंडी लावण्यासाठी कांद्याची चटणी हा उत्तम पर्याय आहे.
तुम्हाला जर चटणीला फोडणी द्यायची असेल तर तेलात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून मिक्स करा. तयार तडका कांद्याची चटणीवर टाका.
खलबत्यात कुटल्याने चटणीची चव अधिक वाढते. गरमागरम ज्वारी , नाचणी , तांदळाच्या भाकरीसोबत कांद्याची चटणी खूपच टेस्टी लागेल.
हवाबंद काचेच्या डब्यात कांद्याची चटणी स्टोर करा. ४-५ दिवस हा पदार्थ चांगला राहतो.