Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

Shreya Maskar

फणसाचे फायदे

फणसामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक असते. ज्यामुळे वजन नियंत्रण राहते. हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पचनक्रिया सुधारते.

Benefits of Jackfruit | yandex

फणसाची गोड पोळी

फणसाची गोड पोळी बनवण्यासाठी फणसाचा गर, साखर किंवा गूळ, तूप इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात ड्रायफ्रूट पेस्ट देखील टाकू शकता.

Fanasachi Poli | google

फणस

फणसाची गोड पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक रसाळ फणसाची निवड करा. त्यानंतर फणस फोडून बिया आणि गरे वेगळे करा.

Jackfruit | yandex

गरे स्वच्छ करा

फणसाचे गरे कोमट पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर फणसाच्या गऱ्यांचे काप करा.

Jackfruit | yandex

साखर

आता मिक्सरमध्ये फणसाच्या गऱ्यांचे काप, साखर किंवा गूळ घालून चांगली पातळ पेस्ट वाटून घ्या. यामध्ये एक थेंबही पाणी टाकू नका.

Sugar | yandex

ड्रायफ्रूट

तुम्हाला आवडत असेल तर काही ड्रायफ्रूट पाण्यात स्वच्छ करून मिक्सरला वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट फणसाच्या मिश्रणात टाका.

Dry Fruits | yandex

तूप

शेवटी एका ताटाला तूप लावून तयार मिश्रण त्यात चांगले पसरवून घ्या. हे ताट २-३ दिवस उन्हात आणि पंख्याखाली वाळवा. जेणेकरून फणसाची पोळी छान सुकेल. त्यानंतर फणसाच्या गोड पोळीचा आस्वाद घ्या.

Ghee | yandex

फणसापासून बनवले जाणारे इतर पदार्थ

उन्हाळा म्हटले की फणसाचा सीझन येतो. तुम्ही फणसाची भाजी, फणसाचे चिप्स, फणसाची पुरी, फणसाचे कटलेट्स या रेसिपी बनवू शकता.

Other Dishes Made from Jackfruit | google

NEXT : उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंकला करा टाटा, बाय बाय; प्या गारेगार 'गुलकंद पान सरबत', पोटाला मिळेल थंडावा

Gulkand Paan Sharbat Recipe | saam tv
येथे क्लिक करा...