Shreya Maskar
गुलकंद पान सरबत बनवण्यासाठी गुलकंद, पान, चिया सीड्स,रोज सिरप , डिंक, दूध, ड्रायफुट्स इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीचे इतर पदार्थ देखील टाकू शकता.
गुलकंद सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम फ्रेश गुलकंद बनवा. यासाठी गुलाबाच्या कोवळ्या पाकळ्यांचा वापर करा. जेणेकरून गुलकंद चवदार लागेल.
विड्याचे पान स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करा आणि मिक्सरला हलके वाटून घ्या. तयार पानांची पेस्ट शेवटी सरबतात टाका आणि चांगले मिक्स करा.
एका ग्लासात चमचाभर गुलकंद, चिया सीड्स, डिंक मिक्स करा. मिश्रण चांगले ढवळून घ्या.
त्यानंतर ग्लासात दूध ओतून मिश्रण एकजीव करून घ्या. शेवटी यात कापलेले ड्रायफ्रूट्रस मिक्स करा. तुम्ही काजू, बदाम आणि पिस्ता आवर्जून यात टाका.
आता हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये १ तास ठेवा. तुम्ही यात वरून बर्फाचे तुकडे देखील टाकू शकता.
शेवटी ग्लासात थोड रोज सिरप टाकून त्यात तयार गुलकंद पान सरबत ओता. वरून ड्रायफ्रूट्रस, गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.
गुलकंद पान सरबत पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच यामुळे ॲसिडीटी होत नाही. उष्णतेमुळे होणारा थकवा आणि जळजळ कमी होते.