Shreya Maskar
उन्हाळा म्हटले की फणसा आलेच. यंदा उन्हाळ्यात पोटभर खाता येईल असा कुरकुरीत स्नॅक्सचा पदार्थ बनवा. फणसाचे चिप्स एकदा खाऊन पाहा.
फणसाचे चिप्स बनवण्यासाठी कच्च्या फणसाचे गरे, खोबरेल तेल, हळद, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते. मीठाचे प्रमाणे योग्य ठेवा. नाहीतर चिप्स खारट होतील.
फणसाचे चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम फणस सोलून गरे काढून घ्या. गरे आणि बिया वेगळ्या करा. जेणेकरून चिप्स छान बनतील.
आता फणसाचे गऱ्यांचे उभे, पातळ काप करून घ्या. चिप्स बनवण्यासाठी कच्च्या फणसाचा वापर करा. काप जास्त मोठे करू नका, नाहीतर तळताना कच्चे राहतील.
आता पॅनमध्ये खोबरेल तेल ओतून ते व्यवस्थित गरम करा. तेल चांगले गरम झाले की त्यात कापलेले फणसाच्या गऱ्याचे तुकडे तळून घ्या.
आता एका बाऊलमध्ये पाणी, हळद, मीठ घालून चांगले मिक्स करा. यांचे योग्य प्रमाणे राहू दे.
तयार मिश्रण तळलेल्या गऱ्यांवर चमच्याने सोडा आणि मिक्स करा. अशाप्रकारे कुरकुरीत फणसाचे चिप्स तयार झाले.
फणसापासून अनेक रेसिपी बनवता येतात. यात फणसाची भाजी, फणसाचे चिप्स, फणसाच्या आठळ्यांची उसळ , फणसाची पोळी यांचा समावेश आहे.