Fansachi Rassa Bhaji Recipe : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

Shreya Maskar

कोकण रेसिपी

बाजारात कच्चे फणस आले आहेत. कोकणात बनवतात अगदी तशी झणझणीत फणसाची रस्सा भाजी बनवा. घरातील सर्वजण आवडीने खातील.

Fansachi Rassa Bhaji | google

फणसाची रस्सा भाजी

फणसाची रस्सा भाजी बनवण्यासाठी कच्चा फणस, सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, मालवणी मसाला, लाल तिखट मसाला, धणे पूड, हळद, कोथिंबीर, पाणी , मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Fansachi Rassa Bhaji | google

कच्चा फणस

फणसाची रस्सा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये पाणी, मीठ, कच्च्या फणसाचे तुकडे आणि हळद टाकून ५ मिनिटे व्यवस्थित उकडवून घ्या.

Raw Jackfruit | yandex

सुकं खोबरं

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुकं खोबरं २ ते ३ मिनिटे भाजून घ्या आणि एका ताटात काढा.

Dry Coconut | yandex

कांदा -टोमॅटो

पॅनमध्ये सुकं खोबरं भाजल्यानंतर कांदा - टोमॅटो, आलं, लसूण भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. मसाला जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही, याची काळजी घ्या.

Onion | yandex

मसाले

पुन्हा पॅन गरम करून त्यात तयार वाटण टाका आणि त्यानंतर यात सर्व मसाले तुमच्या आवडीनुसार मिक्स करा. त्यानंतर धणे पूड, हळद घाला.

Spices | yandex

कोथिंबीर

आता यात पाणी, कच्च्या फणसाच्या उकडवून तुकडे घालून एक उकळी काढून घ्यावी. शेवटी भाजीवर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवून घ्या.

Coriander | yandex

टीप

फणस कुकरला लावताना गरे आणि बिया वेगळ्या करून वाफवून घ्या. तसेच कच्चा फणस भाजीसाठी वापरा. तुम्ही भाजीत शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता.

Jackfruit | yandex

NEXT : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Fansache Cutlet Recipe | saam tv
येथे क्लिक करा...