Shreya Maskar
उन्हाळ्यात कच्च्या फणसाचे खमंग- कुरकुरीत कटलेट्स बनवा. ही रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे.
कच्च्या फणसाचे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी उकडलेला कच्चा फणस, बटाटा, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, ब्रेड क्रम्ब्स , तांदळाचे पीठ किंवा कॉर्न फ्लोअर, मीठ, तेल आणि मसाले इत्यादी साहित्य लागते.
कच्च्या फणसाचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्च्या फणसाची साल काढून बारीक तुकडे करा. यात मीठ घालून कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून शिजवून घ्या.
एका बाऊलमध्ये शिजलेला फणस आणि उकडलेला बटाटा बारीक कुस्करून घ्या. दोन्ही पदार्थ चांगले एकजीव करा.
मिश्रणात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, ब्रेड क्रम्ब्स , तिखट, हळद आणि मीठ घालून एकत्र करा.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून हातावर दाबून त्यांना कटलेटचा आकार द्या. तुम्ही यावर तेलात तळलेला काजू देखील लावू शकता.
तव्यावर तेल गरम करून कच्च्या फणस कटलेट्स दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय करा. कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
कटलेट आणखी कुरकुरीत हवे असतील तर कटलेट्स फ्राय करण्यापूर्वी तांदळाच्या पीठात आणि त्यानंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवा.