Shreya Maskar
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणे खूप गरजेचे असते, नाहीतर अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात आवर्जून घरी गुलाब कुल्फी बनवा. रेसिपी आताच नोट करा.
गुलाब कुल्फी बनवण्यासाठी फॅट दूध, साखर, गुलाब सिरप, गुलाबजल, काजू, बदाम, पिस्ते, वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
गुलाब कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या भांड्यात दूध गरम करून ते अर्धे होईपर्यंत आटवा. दूध मंद आचेवर ठेवून द्या.
यात साखर घालून ढवळा. नंतर गुलाब सिरप, गुलाबजल आणि वेलची पूड मिक्स करा. मिश्रण सतत ढवळत रहा, गुठळ्या होणार नाही, याची खबरदारी घ्या.
या मिश्रणात बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून एकजीव करा. तयार मिश्रण चांगले थंड करा. तुम्ही यात काजू, बदाम, पिस्ता टाकू शकता.
थंड मिश्रण कुल्फीच्या साच्यात ओतून ६-८ तास गुलाब कुल्फी फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. तुम्ही वरून छान गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकू शकता.
उन्हाळ्यात थंडगार गुलाब कुल्फीचा आस्वाद घ्या. तुम्ही यात साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्क वापर करा. यामुळे कुल्फी अजून घट्ट होईल.
उन्हाळ्यात गुलाब त्वचेला टवटवीत करते, गुलाबातील पोषक घटक शरीरातील उष्णता कमी करून पचन सुधारते.