Shreya Maskar
स्ट्रॉबेरी चटणी बनवण्यासाठी ताजी स्ट्रॉबेरी, साखर किंवा गूळ, लिंबाचा रस, लाल तिखट, काळी मिरी पूड, मीठ, जिरे, तेल आणि पुदिन्याची पाने इत्यादी साहित्य लागते.
स्ट्रॉबेरी चटणी बनवण्याची सर्वप्रथम स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करा. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून तेल गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घालून परतून घ्या. जिरे तडतडू लागल्यावर चिरलेली स्ट्रॉबेरी घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे शिजवा. स्ट्रॉबेरी जळणार नाही याची काळजी घ्या.
मिश्रणात साखर किंवा गूळ घालून चांगले मिक्स करा. स्ट्रॉबेरी हळूहळू विरघळून थोडे घट्ट मिश्रण तयार होईल.
त्यानंतर मिश्रणात मीठ, लाल तिखट आणि काळी मिरी घाला. शेवटी लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने घालून आणखी २ मिनिटे शिजवा.
मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. अशाप्रकारे स्वादिष्ट स्ट्रॉबेरी चटणी तयार आहे. गरमागरम पराठ्यासोबत, चपातीसोबत स्ट्रॉबेरी चटणीचा आस्वाद घ्या.
स्ट्रॉबेरी चटणी काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये २-३ दिवस स्टोर करून ठेवून द्या.
स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात.