Kairicha Methamba Recipe : फक्त १० मिनिटांत तयार आंबट-गोड रसरशीत कैरीचा मेथांबा, पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Shreya Maskar

कैरीचा मेथांबा

कैरीचा मेथांबा हा उन्हाळ्यात बनवला जाणारा पदार्थ आहे. याची चव आंबट-गोड-तिखट आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचा मेथांबा उत्तम पदार्थ आहे.

Kairicha Methamba | yandex

कैरी

कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी कैरी, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ , गूळ आणि मेथी इत्यादी साहित्या लागते.

Raw Mango | yandex

कैरीची साले काढा

कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरीची साले काढून बारीक फोडी करून घ्या.

Raw Mango | yandex

मेथी

पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहरी, हिंग, हळद चांगले तडतडू द्या. त्यानंतर फोडणीत मेथी, तिखट घालून परतून घ्या.

Fenugreek | yandex

मीठ

त्यानंतर कैरीचे काप फोडणीत घालून मीठ टाकून चांगले एकजीव करून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवून द्या.

Salt | yandex

गूळ

आता मिश्रणात पाणी आणि गूळ घालून मिश्रण ८-९ मिनिटांसाठी छान शिजवून घ्या. गूळ सतत ढवळत रहा, त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.

Jaggery | yandex

चपाती- मेथांबा

आंबट-गोड-तिखट कैरीचा मेथांबा तयार झाला आहे. गरमागरम चपातीसोबत कैरीचा मेथांब्याचा आस्वाद घ्या.

Kairicha Methamba | yandex

महत्त्वाची टीप

कच्च्या कैऱ्या आधी तेलात आणि मसाल्यात चांगली वाफवून मऊ शिजवणे आणि त्यानंतरच गूळ घालणे.

Kairicha Methamba | google

NEXT : उन्हाळ्यात बनवा चटपटीत मसाला डाळ, संध्याकाळची छोटी भूक जाईल पळून

Masala Chana Dal Recipe | saam tv
येथे क्लिक करा...