Masala Chana Dal Recipe : उन्हाळ्यात बनवा चटपटीत मसाला डाळ, संध्याकाळची छोटी भूक जाईल पळून

Shreya Maskar

मसाला डाळ

मसाला डाळ बनवण्यासाठी चणा डाळ, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, काळं मीठ, सायट्रिक ॲसिड, साखर, हळद, लाल तिखट इत्यादी साहित्य लागते.

Masala Chana Dal | yandex

गरम पाणी

मसाला डाळ बनवण्यासाठी चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 1 ते 2 तास भिजत ठेवा. जर ‌वेळ कमी असेल तर गरम पाण्यात 30 मिनिटे भिजवली तरी चालते.

Hot Water | yandex

डाळ शिजवा

भिजवलेली डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. यात हळद आणि थोडे मीठ घाला. कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढा. डाळ चांगली दाणेदार राहिली तरच मसाला डाळ खायला जास्त छान लागते.

Cook the Dal | yandex

डाळ सुकवा

आता शिजलेली डाळ एका ताटात काढून कडक उन्हात वाळवा. १-२ दिवसांत डाळ चांगली कोरडी होते.

Dry the Dal | yandex

हळद

त्यानंतर एका ताटात डाळ घेऊन त्यात चिमूटभर काळं मीठ, सायट्रिक ॲसिड, साखर, हळद, लाल तिखट घालून चांगले मिक्स करा.

Turmeric | yandex

कढीपत्ता

मसाला डाळीला हलका तडका देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता, लाल तिखट घालून चांगले तडतडू द्या.

Curry Leaves | yandex

मीठ

आता तडक्यात चणा डाळ मिक्स करा. त्यानंतर हलके मीठ टाकून मिक्स करा. पुन्हा एकदा छान परतून घ्या.

Salt | yandex

स्टोर करा

मसाला डाळ अधिक काळ चांगली ठेवण्यासाठी ती काचेच्या बरणीत स्टोर करा. लहान मुलांना छोटी भूक लागली तर ही चटपटीत डाळ नक्की द्या.

Storage | yandex

NEXT : उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार मटका कुल्फी, गारेगार Kulfi खाऊन आठवेल बालपण

Matka Kulfi Recipe | yandex
येथे क्लिक करा...