Shreya Maskar
उन्हाळा म्हटला की थंडगार पदार्थ आले आणि थंड पदार्थ म्हटले तर सर्वात आधी आईस्क्रीम आठवतो. या उन्हाळी सुट्टीत तुम्ही घरीच थंडगार मटका कुल्फी बनवा. रेसिपी खूपच सोपी आहे.
मटका कुल्फी बनवण्यासाठी दूध, काजू, बदाम, पिस्ता, साखर, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
मटका कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये दूध गरम करून मंद आचेवर शिजू द्या. दूध सतत ढवळत रहा. जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही.
यात बारीक कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता टाका. तसेच ड्रायफ्रूट मिक्सची बारीक पूड देखील टाका.
दुसर्या भांड्यात साखर विरघळवून ती मिश्रणात मिक्स करा. त्यानंतर यात बारीक वेलची पावडर टाका आणि सर्व एकजीव करून घ्या.
तयार मिश्रण मटका किंवा आईस्क्रीमच्या भांडत ओता. मटका कुल्फी फ्रिजमध्ये सेट करायला ५-६ तास ठेवून द्या. अशाप्रकारे मटका कुल्फी तयार झाली आहे.
तुम्ही कुल्फीवर वरून काजू, बदाम आणि पिस्ताचे काप देखील टाकू शकता. ही रेसिपी लहान मुलं आवडीने खातील. तसेच तुम्हाला तुमचे बालपण आठवेल.
कुल्फी अधिक क्रीमी बनवण्यासाठी दूध जास्त वेळ आटवा. तसेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारात कुल्फी बनवू शकता. यासाठी केशर, गुलाब इसेन्स, मँगो फ्लेवर चा वापर करा.