Shreya Maskar
अनेक वेळा असे होते की आपली नावडती भाजी जेवणाला असते. अशावेळी झटपट ओली लसूण चटणी बनवा आणि चमचमीत जेवणाचा आस्वाद घ्या.
ओली लसूण चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये शेंगदाणा तेल गरम करून त्यात जिरे, चिमूटभर हिंग टाकून चांगले परतून घ्या. त्यानंतर यात सोललेला लसूण मिक्स करा.
लसूण हलका गोल्डन फ्राय झाला की गॅस बंद करा आणि लसूण एका ताटात काढून घ्या. लसूण जळणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर तो चवीला कडू लागतो.
तळलेला लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून एक बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, जिरे आणि चिंच टाकून पुन्हा एक पेस्ट बनवा.
सर्व मिश्रण एका बाऊलमध्ये काढून चांगले मिक्स करा. जेणेकरून सर्व मसाला नीट एकजीव होईल. फक्त १० मिनिटांत चटणी तयार झाली.
लसूण चटणीला तेल, जिऱ्याचा तडका द्या आणि चटणीचा आस्वाद घ्या. तडका नाही दिला तरी चटणी खूप टेस्टी लागते.
गरमागरम भाकरी, चपाती, भात यांच्यासोबत लसूण चटणीचा आस्वाद घ्या. ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी देखील घेऊन जाऊ शकता.
लसूणमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तदाब कमी होतो, कोलेस्ट्रॉल कमी होते.