Naal 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naal 2: निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना चिमी कशी सापडली, सुधाकर रेड्डींनी सांगितला किस्सा

Naal 2 Film: एवढ्या लहानग्या, गोंडस आणि निरागस त्रिशाची निवड चित्रपटामध्ये कशी झाली? याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सांगितले आहे.

Chetan Bodke

Naal 2

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चित्रपट काल (१० नोव्हेंबर) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून समीक्षकांकडून, सेलिब्रिटी मित्रांकडून आणि चाहत्यांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. ‘ नाळ’मध्ये चैत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होतेय त्या चिमुकल्या चिमीची अर्थात त्रिशा ठोसरची.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चिमिची सोशल मीडियावर ‘डराव डराव’ गाण्यापासून चर्चा होत आहे. सर्वांनाच चित्रपटामध्ये नेमकी ही चिमुकली कोण आहे? असा प्रश्न पडला होता. अखेर या प्रश्नाचं चाहत्यांना उत्तर मिळालं आहे. एवढ्या लहानग्या, गोंडस आणि निरागस त्रिशाची निवड चित्रपटामध्ये कशी झाली ? याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सांगितले आहे. “आम्ही ‘चिमी’ व्यक्तिरेखेसाठी जेव्हा मुलगी शोधत होतो, त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नव्हती. जितकी लहान मुलगी असेल तितके उत्तम, ही गोष्ट माझ्या आणि दिग्दर्शकांच्या डोक्यात होती.”

“आम्ही शक्यतो नवा चेहऱ्याच्या शोधात होतो. कारण आम्हाला अनुभवी चेहरे नको होते, आम्हाला नैसर्गिक अभिनय येणारा चेहरा हवा होता. आम्हाला ती सर्वांनाच खूप आवडली होती. म्हणून आमच्या टीममधून काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे आणि तिचे ऑडिशन घ्यायचे. ती कशी वावरतेय, बोलतेय या सगळ्यांचे निरीक्षण केले आणि आम्हाला 'चिमी' सापडली. जेव्हा आम्ही तिची ऑडिशन घेतली, तेव्हा ती फक्त साडेतीन वर्षांचीच होती. ती खूप गुणी मुलगी असून तिने शुटिंगला आम्हाला चांगला प्रतिसाद दिला.” अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सांगितले. (Marathi Film)

‘नाळ’ चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सुधाकर रेड्डी यंक्कटी यांना तर, सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी हे कलाकार दिसत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडं? आमदारानं अजितदादांचं नाव घेऊन भाजपला डिवचलं

Rice Pakora Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चटपटीत अन् क्रिस्पी तांदळाचे भजी; ५ मिनिटांत होतील तयार

Fruit Cake Recipe: लहानमुलांसाठी या विकेंडला बनवा टेस्टी फ्रूट केक, वाचा सोपी रेसिपी

सलग सुट्ट्यांच्या आनंदात सुस्साट 'सुटले'; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कोंडीत अडकले, VIDEO

Beed News : बीडमध्ये १४ वर्षीय मुलीचा बालविवाह, बनावट आधारकार्डवर छापली खोटी जन्मतारीख; पोलिसांनी उधळला डाव

SCROLL FOR NEXT