नागराज मंजुळे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक. अवघ्या चित्रपटांच्या माध्यमातूनच त्यांनी आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला. त्यांचा २०१८ मध्ये ‘नाळ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील चैत्याने मराठी सिनेसृष्टीमध्ये आपली छाप निर्माण केली. ‘नाळ’च्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ‘नाळ २’.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ’ चित्रपटाची आजही प्रेक्षकांसोबत ‘नाळ’ कायम जोडलेली आहे. चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले असून चित्रपटाच्या दिग्दर्शकांना या चित्रपटाकरिता राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले.
चित्रपटाची भावनिक कथा, त्या चिमुकल्याचे सिमित विश्व, ग्रामीण भाषेचा लहेजा आणि गाणी या सर्वांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘चैत्या’ची निरागसता अनुभवता येणार आहे. येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला ‘नाळ २’ येणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे.
सोशल मीडियावर ‘नाळ २’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘नाळ २’मध्ये नेमके कोणकोणते कलाकार येणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाची कथा, चित्रपटातील गाणी कशी असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान टीझरपाहून ‘नाळ २’ कमाल असणार यात शंकाच नाही. येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी ‘नाळ २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच धमाकेदार असेल, यामध्ये शंका नाही.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी सांगतात, “ ‘नाळ’च्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. आईच्या आणि मुलाच्या नात्यातील खूप सुंदर कथा आहे. ‘नाळ २’ च्या माध्यमातून ही कथा पुढे जाणार आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. नागराज मंजुळे एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून खूप खास आहेत. झी स्टुडिओजविषयी सांगायचे तर, त्यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोघांबरोबर आता माझीही ‘नाळ’ जोडली गेली आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चैत्या त्याच्या खऱ्या आईकडे निघाला आहे, आता त्याचा हा प्रवास त्याला कुठे नेणार, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल...”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.