Bipasha Basu Daughter 1st Bday: बिपाशा बासूचं मालदीवमध्ये हटके सेलिब्रेशन, कारणही आहे एकदम खास

Bipasha Basu News: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि पती करण सिंग ग्रोवरची लेक देवीचा उद्या अर्थात १२ नोव्हेंबरला पहिला वाढदिवस आहे.
Bipasha Basu Daughter 1st Bday
Bipasha Basu Daughter 1st BdayInstagram

Bipasha Basu Daughter 1st Bday

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि पती करण सिंग ग्रोवरची लेक देवीचा उद्या अर्थात १२ नोव्हेंबरला पहिला वाढदिवस आहे. काल रात्री बिपाशा आणि तिचा पती करण लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदिवला पोहोचले आहेत. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर मालदिवमध्ये लेकीच्या प्री- बर्थडे पार्टीच्या काही व्हिडीओ शेअर केल्या आहेत. या पार्टीमध्ये हे तीघंही जंगी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bipasha Basu Daughter 1st Bday
Hemangi Kavi Post: ‘कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या’; दिवाळीनिमित्त हेमांगी कवीने शेअर केली खास आठवण

बिपाशा बासूने इन्स्टाग्राम स्टोरीवर लेक देवीच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, देवी केक खाताना दिसत आहे. देवीच्या वाढदिवसाचा केक जंगल थीमवर बनवलेला होता. व्हिडीओमध्ये देवीने मल्टीकलरचा प्रिंटेड ड्रेस परिधान केलेला दिसतोय. त्या ड्रेसमध्ये ती खूपच क्यूट दिसतेय. हा क्यूट व्हिडिओ शेअर करताना बिपाशाने ‘देवीने पहिला केप कापला’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Bipasha Basu Daughter 1st Bday
Bipasha Basu Daughter 1st BdayInstagram
Bipasha Basu Daughter 1st Bday
Bipasha Basu Daughter 1st BdayInstagram

लेकीचा बर्थडे खास व्हावा यासाठी बिपाशा, पती करण सिंग ग्रोव्हर आणि लेक दिवासोबत मालदीवमध्ये रात्री पोहोचली आहे. जिथे त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. हे स्टार कपल लग्नाच्या ६ वर्षानंतर आई-वडील बनले आहे. या कारणामुळे करण आणि बिपाशा यांना त्यांच्या मुलीचा वाढदिवस खूप खास पद्धतीने साजरा करायचा आहे.

Bipasha Basu Daughter 1st Bday
Hemangi Kavi Post: ‘कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या’; दिवाळीनिमित्त हेमांगी कवीने शेअर केली खास आठवण

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरने अनेकदा इन्स्टाग्रामवर मुलीचे क्यूट फोटो शेअर केले आहे. बिपाशा आणि करण लग्नानंतर तब्बल ६ वर्षांनंतर आई- वडील झालेले आहेत. वयाच्या ४३ व्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये बिपाशाने प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत बेबी बंप फ्लाँट करत फोटोशूटसुद्धा शेअर केले होते.

Bipasha Basu Daughter 1st Bday
Chandra Mohan Dies: प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com