Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

Actor Car Accident : मुंबईच्या पावसात प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडली भयंकर घटना. अभिनेत्याच्या कारचा अपघात झाला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मुंबईच्या मुसळधार पावसात कारचा अपघात

प्रसिद्ध अभिनेत्याचा जीव थोडक्यात वाचला

सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनेत्याने दिली भयंकर घटनेची माहिती

सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. अशात मुंबईच्या रस्त्यावर एक भयंकर घटना घडली आहे. 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचा मुलगा क्षितिजच्या कारचा अपघात झाला आहे. क्षितिज ढोलकिया देखील एक अभिनेता आहे. क्षितिजच्या पार्क केलेल्या कारवर झाड पडले आहे. या घटनेत क्षितिज थोडक्यात बचावला. याची माहिती क्षितिजने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली.

Kshitij Dholakia

व्हिडिओमध्ये एक मोठे झाड पडल्याने कारचे नुकसान झाल्याचे आणि अधिकारी ते झाड हटवण्याचे काम करत असल्याचे दिसत होते. एका व्हिडिओमध्ये क्षितिजने सांगितले, "सध्या माझ्या कारची ही अवस्था आहे. सुदैवाने, कोणालाही दुखापत झालेली नाही." तसेच क्षितिजने आपत्कालीन पथकांच्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले. त्याने लिहिले, "आयुष्य किती अनिश्चित असू शकते, याची ही एक भीतीदायक आठवण आहे. मी कारमध्ये नव्हतो आणि सर्वजण सुरक्षित आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाने केलेल्या तत्पर मदतीबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मी सदैव ऋणी राहीन."

क्षितिज ढोलकिया कोण?

क्षितिज ढोलकियाने नुकतीच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली असून तो 'माँ है ना' आणि 'नागिन ७' मध्ये दिसला होता. 'नागिन ७'मध्ये क्षितिज ढोलकियाने 'नाग'ची भूमिका साकारली होती. त्याने साजिद खान दिग्दर्शित 'हमशकल्स' (२०१४) मध्ये सहाय्यक म्हणून काम केले आणि त्यानंतर २०१९ मधील 'ड्रीम गर्ल' या चित्रपटासाठीही काम केले.क्षितिजची आई उर्वशी ढोलकिया ही टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. उर्वशी ढोलकिया अनेक टिव्ही मालिका, रिॲलिटी शोमध्ये झळकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT