पवारांच्या राष्ट्रवादीचा खासदारांना व्हीप जारी, डिलिमिटेशन बिलावरून मविआत फूट? राजकारणात खळबळ

Delimitation Bill Sparks Political Storm: डिलिमेशन बिलासाठी खासदारांना शेकडो कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप राऊतांनी केलाय. कोणत्या पक्षाच्या खासदारांना ही ऑफर आलीय? राऊतांनी नेमकं कुणाचं नाव घेतलंय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
SANJAY RAUT'S RS 150 CRORE ALLEGATION
SANJAY RAUT'S RS 150 CRORE ALLEGATIONsaam tv
Published On: 

संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी मोदी सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन विधेयकावरून देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चिन्ह आहेत... कारण पवारांच्या राष्ट्रवादीनं डिलिमिटेशनच्या बिलाला सशर्त पाठिंबा देण्याचे संकेत सुप्रिया सुळेंनी दिल्यामुळे मविआत फूट पडण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळेच ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांना थेट '21व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार' म्हटलयं....मात्र यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळेंनी सावध प्रतिक्रिया दिलीय.

दुसरीकडे डिलिमिटेशनसाठी खासदारांना 150 कोटी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय.. त्यांच्या या आरोपांवर भाजपनं तीव्र आक्षेप घेतला असून राऊतांनी माफी मागावी अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडलीय.

दुसरीकडे, या वादात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेने... पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या चार दिवसांच्या अधिवेशनाला हजर राहण्यासाठी सर्व खासदारादांना व्हीप बजावलाय.

विशेष म्हणजे, डिलिमिटेशन बिलासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांशी संपर्क साधला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय...त्यातच इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे गैरहजर राहणार असल्याने, पवारांची राष्ट्रवादी या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. मात्र डिलिमिटेशनवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस नताशा आव्हाड यांनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे...

2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची संधी भाजपकडे होती. मात्र, आता भाजप पुन्हा महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मनमानी पद्धतीनं परिसीमन विधेयकाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला आरक्षण आणि परिसीमन हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. या दोन्ही मुद्द्यांची गल्लत करून भाजपच्या भूमिकेला बळी पडण्याची गंभीर चूक करू नका.

एकीकडे डिलिमिटेशनच्या आडून 2029 च्या निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि विरोधक करतायत...अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजावलेला व्हिप आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळेंची गैरहजेरी यामुळे सस्पेन्स वाढलाय. तसंच पवारांच्याच राष्ट्रवादीत डिलिमिटेशनच्या विरोधातही उघड सूर उमटू लागलाय. डिलिमिटेशन बिलामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असून मविआत उभी फूट पडणार की काय अशी चर्चा आता सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.