Kakuda Movie Poster Movie
मनोरंजन बातम्या

Kakuda Movie Relased Date: मुंज्यानंतर आता 'ककुडा'... आदित्य सरपोतदारचा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमाही बॉक्स ऑफिस गाजवणार?

Aditya Sarpotdar's Latest Movie Kakuda's Relased Date: प्रेक्षकांकडून 'मुंज्या' सारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळाला. मुंज्यानंतर आता दिग्दर्शिक आदित्य सरपोतदार यांचा 'ककुडा' हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिलाश पटेल, साम टिव्ही

मुंज्यानंतर आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'ककुडा' हा हॉरर कॉमेडी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय. यात सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम हे त्रिकूट स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे लग्नानंतर प्रदर्शित होणारा सोनाक्षीचा हा पहिलाच सिनेमा आहे. हा चित्रपट सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित न होता, 12 जुलैला थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.

बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री असलेली सोनाक्षी सिन्हानं दबंगमधून सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर हटके सिनेमे दिलेत. त्यानंतर सध्या नुकत्याच केलेल्या लग्नामुळे सोनाक्षी चर्चेत आलीय. आता लग्नानंतरचा तिचा पहिला सिनेमा ककुडाच्या रुपात प्रदर्शित होणार आहे.

ककुडा हा सिनेमा एका विचित्र भयकथेवर आधारित आहे. यामध्ये त्या गावातील प्रत्येक घराला दोन दरवाजे असल्याचं पाहायला मिळतं. या गावातले लोक दर मंगळवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता घराचा छोटा दरवाजा उघडाच ठेवतात. याचं कारण आहे ते 'ककुडा'. पण या नियमात थोडीशीसुद्धा चूक झाली, म्हणजे कुणी दरवाजा उघडा ठेवला नाही, तर तिथपासून तेराव्या दिवशी त्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू पक्का. ही कहाणी ककुडाच्या शापावर आधारित आहे.

सिनेमात सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम एकत्रित काम करताना दिसणार आहेत. चित्रपटात साकिब सलीम सोनाक्षीचा होणारा नवऱ्याची व्यक्तीरेखा साकारलीय. तर रितेश देशमुख भूत पळवणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारतोय. त्यामुळे हा सिनेमाही मुंज्यासारखाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहावं लागेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT