Abhishek Ghosalkar Death: Saamtv
मनोरंजन बातम्या

Abhishek Ghosalkar Death: मृदू स्वभाव, हसरं व्यक्तिमत्व, मोठ्या भावासारखी मदत... अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूने अवधूत गुप्ते भावुक

Abhishek Ghosalkar Death: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसावळकर यांच्या निधनाने दहिसर परिसरातील नागरिक, राजकीय क्षेत्रासह, मनोरंजन जगतातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर गीतकार अवधूत गुप्ते यांनीही शोक व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

Abhishek Ghosavalkar Death:

दहिसरमध्ये काल रात्री शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर दहिसर परिसरातील नागरिक, राजकीय क्षेत्रासह, मनोरंजन जगतातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर गीतकार अवधूत गुप्ते यांनीही शोक व्यक्त केला आहे.

काय म्हणालेत अवधूत गुप्ते?

"दहिसरचे माजी नगरसेवक आणि लाडके नेतृत्व श्री अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा प्रत्येक दहिसर-बोरिवलीकर नागरिकांसाठी जितका धक्कादायक आणि दुःखद आहे तितकाच तो माझ्यासाठी देखील आहे! अत्यंत मृदू स्वभावाचे अभिषेक हे कायमच एक मनमिळावू आणि हसरे व्यक्तिमत्व होते. ते कायम लोकांच्या अडीअडचणींना मदतीसाठी धावून जात असत," असे अवधूत गुप्ते यांनी म्हटले आहे.

"कोरोना काळामध्ये आमच्या ‘सूर नवा ध्यास नवा‘ कार्यक्रमाच्या चित्रिकरणादरम्यान दररोज सेटवर दोन-चार लोक कोव्हिड पॉझिटिव्ह येत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड माळवून देण्यापासून ते ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्यापर्यंत अभिषेक प्रचंड मदत करत. माझ्या आईच्या आजारपणात तर त्यांनी मोठ्या भावासारखी मदत केली,"

दुःखाची कल्पना करु शकत नाही...

"अर्थात, त्यांना हा संस्कारांचा वारसा मिळाला तो त्यांच्या वडिलांकडून, म्हणजेच आमचे ज्येष्ठ स्नेही मा. श्री. विनोदजी घोसाळकर यांच्याकडून. विनोदजींच्या दुःखाची मी कल्पनाच करू शकत नाही! दुःखाचा हा डोंगर पार करण्यासाठी आणि आपल्या सोबतच आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी लागणारी संपूर्ण शक्ती आई एकविरा त्यांना देवो!"

अभिषेकजिंच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे, तर आम्हा समस्त दहिसर-बोरवलीकरांचे फार मोठे नुकसान झाले आहे! ईश्वर अभिषेकजिंच्या आत्म्यास शांती देवो! ॐ शांती!! 💐(Latest marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

SCROLL FOR NEXT