2 D आणि 3 D रांगोळीनं रेखाटला कोरोना महामारीचा काळ; पहा ही अप्रतिम रांगोळी...

मागच्या दोन वर्षांपासून अनुभवलेली कोरोना महामारी वसईतील कलाकारांनी रांगोळीतून साकारली आहे. वसईच्या न्यु इंग्लिश स्कुलमध्ये हे प्रदर्शन भरविले आहे.
2 D आणि 3 D रांगोळीनं रेखाटला कोरोना महामारीचा काळ; पहा ही अप्रतिम रांगोळी...
2 D आणि 3 D रांगोळीनं रेखाटला कोरोना महामारीचा काळ; पहा ही अप्रतिम रांगोळी...चेतन इंगळे
Published On

वसई-विरार: मागच्या दोन वर्षांपासून अनुभवलेली कोरोना महामारी वसईतील कलाकारांनी रांगोळीतून साकारली आहे. या रांगोळीचे वसईच्या न्यु इंग्लिश स्कुल मध्ये 2 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शन भरविले आहे. या रांगोळी प्रदर्शनात कोरोना महामारीचा जीवघेणा काळ, दारात आलेली रुग्णवाहिका, कोरोनाणे मृत झालेला व्यक्ती, मृत व्यक्तीची जळणारी चिता, त्यानंतर त्यांच्या घरावर ओढलेले दुःख हे हुबेहूब रांगोळीतून वसईतील रांगोळी कलाकारांनी साकारले आहे. (2D and 3D Rangoli theme on the Corona pandemic period; Check out this amazing rangoli)

हे देखील पहा -

एवढेच नाही तर पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालाची रांगोळी, मोझाक रांगोळी, रांगोळी काडतानाची रांगोळी, टू डायमेंशन (2 D) रांगोळी, थ्री डायमेंशन (3 D) रांगोळी, डेथ रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी, वसईतील प्रसिद्ध पापलेट रांगोळी आशा विविध प्रकारच्या रांगोळ्या या प्रदर्शनात नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. ही रांगोळी काढणारे सर्व कलाकार हे वसईच्या जूचंद्र आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. या कलाकारांनी देशविदेशात रांगोळीमध्ये आपले नाव कमावले आहे.

2 D आणि 3 D रांगोळीनं रेखाटला कोरोना महामारीचा काळ; पहा ही अप्रतिम रांगोळी...
महाराष्ट्राच्या राजकारणातलं नवं शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या नव्या घराचं उद्घाटन...

या कलाकारांच्या रांगोळीची कला ही वसई, विरार, नालासोपारा येथील नागरिकांनाही पाहता यावी यासाठी बर्वे एज्युकेशन सोसायटी, न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाह ही करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com