मुंबईमध्ये (Mumbai) एका मॅक्सिकन महिलेवर अत्याचार (Maxican Women DJ Physically Abusing) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३२ वर्षीय मेक्सिकन महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी म्युझिक इव्हेंट कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रतीक पांडे (३६ वर्षे) असं या आरोपीचे नाव आहे.
प्रतीक म्युझिक इव्हेंट कंपनी स्लिक एंटरटेन्मेंटचा मालक (Event Management Company Owner Prateek Pandey) आहे. आरोपीने पीडित महिलेला तिचे करिअर खराब करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रतीक पांडे मुंबईसह इतर ठिकाणी डान्स आणि म्युझिक कार्यक्रमाचे आयोजन करतो. प्रतीक पांडेने मॅक्सिकन महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिला धमकी दिली. आरोपीने पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसंच त्याने पीडित महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले. पीडित महिला पेशाने डीजे असून ती आरोपीच्या कंपनीत कामाला होती. २०१२ साली मॉडेलिंगच्या निमित्ताने ती भारतामध्ये आली होती. तर आरोपी हा विवाहित असून त्याचे २०२० मध्ये लग्न झाले होते.
पीडित महिला मॅक्सिकोतील टबॅक्सो येथिल रहिवासी आहे. आरोपीने पीडितेवर कोलकाता, बंगळुरू, इंदूर आणि इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवल - टुमॉरोलँड येथे अनेकदा लैंगिक अत्याचार केले. पीडितेचे वकील अरबाज पठाण यांनी सांगितले की, 'आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आहे. त्याने पीडित महिलेच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी पीडित महिलेला आक्षेपार्ह फोटो, अश्लिल आणि धमकीचे मेसेज पाठवत होता.
तसंच, 'आरोपीने पीडितेला धमकी दिली होती की, जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो तिचे म्युझिकचे करिअर खराब करेल. या आरोपीसारखी लोकं नोकरी देण्याच्या नावाखाली परदेशी नागरिकांना त्रास देत आहे आणि त्यांचे लैंगिक शोषण करत आहे. हे सर्व थांबले पाहिजे.', असं देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, पीडित महिला प्रतीक पांडेला जुलै २०१७ पासून ओळखते. ती म्युझिक आणि डीजे कार्यक्रमासाठी आरोपीला भेटत होती. याचदरम्यान आरोपी तिचा लैंगिक छळ करत होता आणि तिला धमकी देत होता.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितीने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपीला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.