Mrunal Thakur Ahirani Language Saam tv
मनोरंजन बातम्या

Mrunal Thakur: काय बोली राह्यली! अहिराणीचा गोडवा अन् मृणाल ठाकूरचा ठसकेबाज अंदाज; नेटकऱ्यांची जिंकली मन, पाहा VIDEO

Mrunal Thakur Ahirani Language: मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर अहिराणी भाषेत बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या खास अंदाजाचं नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत आहे.

Shruti Vilas Kadam

Mrunal Thakur Ahirani Language: बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत झळकणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात ती आपल्या मूळ बोलीभाषेत म्हणजेच अहिराणी भाषेत संवाद साधताना दिसते आहे.

हा व्हिडिओ नुकत्याच झालेल्या “दो दिवाने सहर मै” चित्रपटाच्या प्रोमोशन ट्रेलर लॉन्चचा आहे. जिथे मृणाल आणि तिचा सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने तिला अहिराणी भाषेतच प्रश्न विचारला आणि त्यावर मृणालने हसतमुखाने उत्तर दिले आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रिपोर्टरने मृणालशी अहिराणी भाषेत विचारते, 'तुला सर्वात जास्त काय आवडतं? वांग्यानं भरीत, बट्टी गोटी, वांग्यानं भाजी की शेव भाजी?' मृणाल या प्रश्नावर खूप खूश होते आणि हसत-हसत उत्तर दिते 'काय बोली राह्यली. अडीच वाजीगयना, जेवायना शे मले. वांग्यानं भरीत पहिले. एखादी बट्ट जोडे.' पुढे मृणालने त्या रिपोर्टरला विचारलं, “वरण बट्टी लायेल शे ना तू?” मग ती रिपोर्टर म्हणते, “मी आता आणलं नाहीय; पण तू माझ्याबरोबर चल मी तुला खायला देते”. त्यावर मृणाल म्हणते, “चल, येस मी… वरण बट्टी, तूप आणि लिंबूशिवाय नाही होणार हां…” या संवादातील तिचा पारंपरिक खान्देशी अंदाज प्रेक्षकांना फार आवडला आहे.

दरम्यान, लवकरच मृणाल ठाकूरचा ‘दो दिवाने सहर मै’  हा चित्रपट  २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात  मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची रोमँटिक जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT