Elvish Yadav: 'मला माझं प्रेम मिळालं...'; एल्विश यादवने 'या' अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा, खास पोस्ट करुन दिली गुड न्यूज

Elvish and Jiya: एल्विश यादवचा साखरपुडा झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. त्याने एका फोटो पोस्ट केला त्यात त्याने मुलीचा हात धरलेला आणि हातात हिऱ्याची अंगठी दिसत आहे.
Elvish and Jiya
Elvish and JiyaSaam Tv
Published On

Elvish and Jiya: कालपासून सोशल मिडियावर एल्विश यादवने साखरपुडा केले आहे अशा बातम्या व्हायरल होत आहे. यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. त्याने अभिनेत्री जिया शंकरशी साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका मुलीचा हात धरून आहे. त्याने जिया शंकरला टॅग केले आहे आणि लिहिले आहे की त्याने प्रेमाला दुसरी संधी दिली आणि पुन्हा प्रेम मिळाले.ही पोस्ट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि एल्विश खरोखरच साखरपुडा केले आहे की हे आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन आहे अशी चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

एल्विश यादवने "लाफ्टर शेफ्स" मध्ये अनेक वेळा संकेत दिले होते की तो लवकरच लग्न करणार आहे आणि त्याच्या आयुष्यात कोणीतरी आहे. त्याने तिचे नाव उघड केले नाही, परंतु आता त्याने एक फोटो शेअर केला आहे. एल्विश यादव २८ वर्षांचा आहे आणि जिया त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, जिया मोठ्या हिऱ्याची अंगठी घातलेली दिसत आहे.

Elvish and Jiya
Prajakta Gaikwad: प्राजक्ता साकारणार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका; 'भिडेवाडा' चित्रपटाची भव्य घोषणा

एल्विशच्या पोस्टमुळे चाहते आश्चर्यचकित झाले असले तरी, त्यांनी आधीच या कपलला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. एल्विश किंवा जिया यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, दोघांनी साखरपुड्याच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली जेव्हा जिया शंकरनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एल्विशची पोस्ट पुन्हा शेअर केली

Elvish and Jiya
Box Office Collection: 'बॉर्डर 2' आणि 'मर्दानी 3' काटे की टक्कर; तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

एल्विश यादवचे अफेअर्स

एल्विश यादवच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि सोशल मिडिया इंफ्लुइन्सरसोबत जोडलं आहे. त्याचे नाव मनीषा राणी, कीर्ती मेहरा, अंजली अरोरा, उर्वशी रौतेला आणि अलिकडेच जन्नत झुबेर यांच्याशी जोडले गेले आहे. एल्विश यादवने जन्नत झुबेरसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले होते, यामध्ये त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक झाले होते. दोघांनी "लाफ्टर शेफ्स ३" मध्येही एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांची नावे एकमेकांशी जोडली जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com