Pune Death News SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pune Death News : प्रसिद्ध कलाकाराचे निधन; दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा झटका, संगीत विश्वात हळहळ

Mridangam Maestro Passes Away : प्रसिद्ध मृदंगम वादक यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संगीत क्षेत्रात शोककळा पसरली. हरहुन्नरी कलाकाराबद्दल जाणून घेऊयात.

Shreya Maskar

दिवाळीच्या उत्सवात संगीत विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे ६ नाव्हेंबर २०२६ रोजी शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी बाणेर येथे आयोजित 'दिवाळी पहाट' कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली असून, देशभरातील संगीतकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांनी सकाळी ७ वाजता आपले सादरीकरण सुरू केले होते. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ वादन केले. कार्यक्रमादरम्यान ते मंचावर कोसळले. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्वरित मंचावर धाव घेत त्यांना सीपीआर (CPR) दिले. रुग्णवाहिका बोलावून पार्थसारथी यांना मनिपाल रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाने दिलेल्या निवेदनानुसार, घटनास्थळी 'ॲडव्हान्स्ड कार्डिओव्हस्कुलर लाईफ सपोर्ट' (ACLS) प्रोटोकॉलनुसार सीपीआर सुरू करण्यात आला होता आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतरही आपत्कालीन वैद्यकीय पथकाने प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, तातडीचे आणि अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांनी लुई बँक्ससारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केले होते. तसेच, ते 'माइल्स फ्रॉम इंडिया' या जागतिक संगीत प्रकल्पाचाही भाग होते. ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शंकर महादेवन यांची पोस्ट

फक्त हे पचवता येत नाही! माझे आणि संगीत विश्वाचे खूप मोठे नुकसान! सर्वोत्कृष्ट मृदंगवादक आणि अपवादात्मक संगीतकारांपैकी एक प्रिय श्रीधर पार्थसारथी आम्हाला सोडून गेले. सुमारे ४० वर्षांपूर्वीची माझी पहिली कर्नाटक शास्त्रीय संगीत मैफल श्रीधरसोबत मृदंगावर झाली होती. आम्ही संगीत, विनोद आणि वेड्या हास्यासह तास आणि दिवस घालवले आहेत. मैफल वाजवताना त्यांचे निधन झाले. आपण कल्पना करू शकता? या ग्रहातून बाहेर पडण्याचा काय मार्ग आहे. देव त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करो आणि त्यांना शक्ती देवो! लव्ह यू श्रीधर..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला, पण ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी येणार? अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: चमत्काराचे दावे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या खरातची दिवाळी तुरुंगातच

Liver Damage : लिव्हर खराब होण्यापूर्वी हातांवर दिसतात 'हे' ७ संकेत; लगेच सावध व्हा, नाहीतर...

Leftover Rice Benefits: रात्रीचा शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

Ginger Tea: चहा उकळण्याआधी की उकळल्यानंतर आलं कधी टाकावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT