Palghar : तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री; जव्हारच्या भूमीपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव

Palghar News : जव्हार तालुक्यातील सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
BHIKLYA DHINDA HONOURED WITH PADMA SHRI; JAWHAR'S TARPA MAESTRO BRINGS GLORY TO TRIBAL CULTURE
BHIKLYA DHINDA HONOURED WITH PADMA SHRI; JAWHAR'S TARPA MAESTRO BRINGS GLORY TO TRIBAL CULTURESaam Tv
Published On
Summary
  • भिकल्या धिंडा यांना आदिवासी लोककलेतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी हा प्रतिष्ठेचा सन्मान स्वीकारला

  • तारपा वादन कलेच्या जतन आणि प्रसारासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले

फैय्याज शेख, पालघर

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावाचे ज्येष्ठ आदिवासी समाजभूषण आणि सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना देशातील प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना संपूर्ण पालघर जिल्हा, जव्हार तालुका आणि आदिवासी समाजासाठी तो अभिमानाचा क्षण ठरला.

आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या तारपा वादन कलेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी भिकल्या धिंडा यांनी आयुष्यभर अविरत कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पुरस्कार बहाल केला. त्यांच्या कलेमुळे आदिवासी लोकसंस्कृतीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

BHIKLYA DHINDA HONOURED WITH PADMA SHRI; JAWHAR'S TARPA MAESTRO BRINGS GLORY TO TRIBAL CULTURE
Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

तारपा वादनाच्या माध्यमातून त्यांनी जव्हार, पालघर आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा ठसा देशभर उमटवला. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव आणि विविध व्यासपीठांवर त्यांनी आपल्या कलेची छाप सोडत आदिवासी संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे आजही ते आदिवासी समाजातील युवा कलाकारांसाठी प्रेरणास्थान मानले जातात. भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हा सन्मान केवळ एका कलाकाराचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाच्या कला, संस्कृती आणि परंपरेचा गौरव असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

BHIKLYA DHINDA HONOURED WITH PADMA SHRI; JAWHAR'S TARPA MAESTRO BRINGS GLORY TO TRIBAL CULTURE
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून सक्रीय! २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

“आपल्या कलेने, संस्कृतीने आणि परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याने आपण संपूर्ण देशाचा अभिमान वाढविला आहे,” अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भिकल्या धिंडा यांना मिळालेला पद्मश्री सन्मान हा आदिवासी लोककलेच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जात आहे. त्यांच्या कार्यातून भावी पिढ्यांना आपल्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा मिळणार असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com