sursh dhas on prajakta mali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या तक्रारीवर धस यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, 'प्राजक्ता ताईचं नाव फक्त....'

Prajakta Mali : बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरुअसल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर करत प्राजक्ता माळीचे नाव त्यांच्या वक्तव्यात जोडले पण, या वक्तव्यामध्ये प्राजक्ताच्या नावाचा समावेश का केला याचे स्पष्टीकरण धस यांनी दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prajakta Mali : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. या प्रकरणात धस यांनी रश्मिका मंदानासह प्राजक्ता माळीचं नाव घेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती. या टीकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला आयोगाकडे तक्रार करत या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी तसेच आरोप करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी प्राजक्ता माळीने केली आहे. आज प्राजक्ता या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन तिची बाजू मांडणार आहे.

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली होती. अवैधरीत्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. दरम्यान, या वक्तव्यात त्यांनी प्राजक्ता मळीचे नाव का घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना धस म्हणाले, मी रश्मिका मंदाना, प्राजक्ताताई, सपना चौधरी यांची नावे फक्त उदाहरण म्ह्णून घेतली होती. मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडला. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली तुम्ही या राज्याचे कृषीमंत्री आहेत तरी तुम्ही तिकडे रश्मिका मंदानांचा कार्यक्रम का घेता? तुम्हाला हे कसं काय योग्य वाटतं? असा प्रश्न मला धनंजय मुंडेंना यांना करायचा होता. कारण त्यांना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही. असे धस म्हणाले.

धस पुढे म्हणाले, कोणत्याही महिला कलाकाराचा अपमान होईल असे मी काहीही बोललेलो नाही. माझे वक्तव्य त्यांनी बघावे आणि जर त्यांना मी दोषी वाटलो तर त्यांनी नक्कीच महिला आयोगाकडे माझी तक्रार करावी. प्राजक्ताताईंनीचा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम मी आवडीने पाहात असतो. एक मराठी मुलगी प्रगती करतेय, हे पाहून मला बरं वाटतं. मी त्यांचा उल्लेख कायम ताई म्हणूनच केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार, थंड डोक्याने नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाचा पहिला CCTV समोर

Maharashtra Live News Update : बिबट्यापासून बचावासाठी महिलांची अनोखी शक्कल

दिवाळीत बनवलेली शेव उरले असून मऊ झालेत? पाहा ते पुन्हा कुरकुरीत कशी बनवावे?

भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

Blind Restaurant: डोळ्यांनी नाही, संवेदनांनी अनुभवा जेवण; दृष्टिहीनांसारखे जगण्याचा अनुभव देणारा उपक्रम

SCROLL FOR NEXT