Mithun Chakraborty  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित, भावूक होऊन म्हणाले...

Dadasaheb Phalke Award : आपल्या अभिनयाने आणि डान्सने सर्वांची मने जिंकणाऱ्या बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती भावना व्यक्त करत काय बोलले जाणून घ्या.

Shreya Maskar

नवी दिल्ली येथे काल म्हणजे (8 ऑक्टोबर) रोजी राष्ट्रीय पुरस्कारांचा सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. अनेक मोठ्या कलाकारांना या सोहळ्याला सन्मानित देखील करण्यात आले. हा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते करण्यात आला.

मनोरंजन विश्वात ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठे नाव कमावले आहे. त्यांनी ७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गाजवला आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यांची विनोदी वृत्ती देखील प्रेक्षकांना खूप आवडते.

द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि डान्सर मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारावर मिथुन चक्रवर्ती यांनी आपलं नाव कोरलं आहे. मिथुन दादांची इंडस्ट्रीमध्ये मोठी कारकीर्द केली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मिथुन चक्रवर्ती यांच्या डान्सचे दिवाने आहेत. यंदा या राष्ट्रीय पुरस्करांची घोषणा ऑगस्ट महिन्यात करण्यात आली होती. पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती हे खूप जास्त भावुक झाले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मिथुन चक्रवर्ती हे आभार व्यक्त करताना बोले की, "माझ्या रंगावरून, दिसण्यावरून मला खूप टोमणे मारण्यात आले. पण मी कधीच खचून गेलो नाही. इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. मला जेव्हा समजलं की मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार आहे तेव्हा विश्वास बसत नव्हता. मात्र मला आनंद खूप झाला होता."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT