President Murmu: महिला सशक्तिकरणासाठी योजना सुरू; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण

President Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संपुर्ण देशाला संबोधित केलं. स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत त्यांनी आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. महात्मा गांधींनी देशाला जोडण्याचे काम केल्याचं राष्ट्रपती मुर्म म्हणाल्या.
President Murmu: महिला सशक्तिकरणासाठी योजना सुरू; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण
Published On

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. राष्टपती मुर्मू यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. महात्मा गांधींनी देशाला जोडण्याचे काम केले असल्याचं म्हणत भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाल्या.

देशाला संपूर्ण वैभव प्राप्त होईल, असे राष्ट्रपती म्हणाले. ते म्हणाले, "सर्व देशवासी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त फडकणारा तिरंगा झेंडा लाल किल्ल्यावर असो, राज्यांच्या राजधानीत असो किंवा आसपास असो. ते पाहून आमले अंतःकरण उत्साहाने भरून जाते.

दरम्यान "आज १४ ऑगस्ट रोजी आपला देश फाळणी स्मृती दिन पाळत आहे. फाळणीची भीषणता लक्षात ठेवण्याचा हा दिवस आहे. जेव्हा आपल्या महान राष्ट्राची फाळणी झाली तेव्हा लाखो लोकांना पळून जावे लागले आणि स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आपण या अभूतपूर्व मानवी शोकांतिकेचे स्मरण करतो. तसेच उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसोबत आपण एकजुटीने उभे असल्याचं सांगतो असं, राष्ट्रपती म्हणाल्या.

ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबासोबत विविध सण साजरे करतो, त्याचप्रमाणे आपण आपला स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन आपल्या कुटुंबासोबत साजरा करतो. आपण अशा परंपरेचा भाग आहोत. ही परंपरा स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने आणि भावी पिढ्यांच्या आकांक्षांना जोडते. पुढील वर्षांमध्ये आपण आपल्या राष्ट्राला पुन्हा पूर्ण वैभव प्राप्त होईल असं राष्ट्रपती मुर्मू आपल्या अभिभाषणात म्हणाल्या.

अनेक सरकारी योजनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे विकास केलाय. देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन आणि सुविधा दिल्या आहेत.सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. देशभरात 'नारी शक्ती'चा विस्तार करण्याच्या दिशेने काम करत असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com